महाराष्ट्र

देशात परिस्थिती गंभीर; आता भाजपचे पुढारी कोणाचे राजीनामे मागणार? सेनेचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगवा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. आता भाजपचे पुढारी कोणाचे राजीनामे मागणार? सेनेचा सवाल (Whose resignation will the BJP leader demand? The question of the Sena).

देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत.  त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेने केला आहे (Now, whose resignation is the BJP leader going to demand? Shiv Sena has asked such a question). शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशातील कोरोना स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.

सामना’च्या अग्रलेखात नेमके काय

 कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरे तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा (BJP leaders should do it).परिस्थिती हाताबाहेर गेलीच आहे.

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधीपक्षाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

कोविडच्या युद्धात आता संरक्षण दलास उतरावे लागले. रशियाची लस ही भारतात पोहोचत आहे. पाकिस्तानसारखा देशही भारताला आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करू इच्छितो.

मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय योजना बनवून त्यात सर्वपक्षीय नेत्यांना सामील करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाने डोळे उघडले हे ठीक, पण केंद्र सरकारने उघड्या डोळयाने पाऊल टाकावे हेच खरे! असा टोला शिवसेनेने लगावला आहे (Tola has been imposed by Shiv Sena).

सर्वोच्च न्यायालय नक्की काय करणार आहे?

झोपी गेलेला जागा झाला अशी काहीशी अवस्था आपल्या न्यायालयांबाबत झालेली दिसते. ‘आम्ही जागे आहोत’ असे ते अलीकडे वारंवार सांगून लोकांनाही जागे करीत आहेत. मद्रास हायकोर्टाने कोरोनासंदर्भात निवडणूक आयोगाचे कान उपटल्यावर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही डोळे वटारले आहेत.

अजय देवगणकडून मुंबई पालिकेला 1 कोटी; दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर

राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणे केंद्र सरकारला सुनावले आहे (The Supreme Court has said that the central government has). देशातली कोरोनास्थिती गंभीरच आहे. ऑक्सिजन, बेड, लसीची कमतरता हे विषय चिंताजनक आहेत.

देशातील गंभीर कोरोनास्थितीची स्वतःहून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालय शेवटी सांगत आहे, ‘आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही’. म्हणजे सर्वोच्च न्यायालय नक्की काय करणार आहे? असा सवाल शिवसेनेने केला आहे (What exactly is the Supreme Court going to do? Shiv Sena has asked such a question).

सर्वोच्च न्यायालयाच्या बघ्याच्या भूमिकेमुळेच देशावर अरिष्ट

कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातले मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आरोग्यविषयक यंत्रणा कोलमडली आहे आणि देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?( Whose resignation is the BJP leader going to demand?) महाराष्ट्रात कोविड इस्पितळांना लागलेल्या आगींचे कारण देत भाजपचे लोक राज्य सरकारचा राजीनामा मागतात. पण उत्तर प्रदेश, दिल्लीसह संपूर्ण देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा हे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्ष सुनावले आहे. ते काही असो. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशावर हे अरिष्ट ओढवले आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे (Shiv Sena has also criticized the Supreme Court for taking a watchful role so far).

आम्ही फक्त बघे नाहीत, हे सांगण्याची वेळ आली नसती

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील शक्तिप्रदर्शन, हरिद्वारचा कुंभमेळा, त्यानिमित्त सुरू झालेले राजकारण आणि लपवाछपवी याबाबत बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आदळले आहे.

मास्क न वापरल्यामुळे थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओचा यांना दंड ठोठावण्यात आल्याची बातमी आपल्या देशातील न्यायालयांची झापडे उघडणारी आहे. थायलंडमध्ये कोरोनाच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत. पंतप्रधान जनरल प्रयुत हे लस खरेदी बैठकीत उपस्थित होते, पण त्यांनी मास्क घातला नव्हता.

Coronavirus: Don’t hoard oxygen cylinders and create artificial scarcity, Delhi HC tells residents

बँकॉकचे गव्हर्नर असाविन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून पंतप्रधानांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो ही जोडला. त्या बैठकीत इतरांनी मास्कचा वापर केला होता तसा थायलंडच्या पंतप्रधानांनी मास्कचा वापर केला नव्हता. त्यानंतर संपूर्ण देशातून पंतप्रधानांवर टीकेचा मारा सुरू झाला आणि पोलिसांना पंतप्रधानांवर कारवाई करावी लागली. थायलंडच्या पोलिसांनी जे केले ते वेळोवेळी आपल्या न्यायालयाने केले असते तर ‘आम्ही फक्त बघे नाहीत’ असे सांगण्याची वेळ आली नसती.

राजकीय ईर्षेपोटी देशाचे स्मशान

पश्चिम बंगाल निवडणुकीत देशाचे गृहमंत्री विनामास्क गर्दीत वावरत होते. जनता विनामास्क रोड शो आणि सभांना गर्दी करीत होती. कुंभमेळयातही तेच भयंकर चित्र होते. यावेळी निवडणूक आयोग, पोलीस आणि न्यायालयेही बघ्याच्याच भूमिकेत होती.

कोरोनाबाबत हिंदुस्थानची परिस्थिती विदारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे व त्यास सोनिया गांधी किंवा पंडित नेहरू, इंदिरा गांधी जबाबदार नाहीत. ऑक्सिजन पुरवठा व लसीचे वितरण याबाबत राष्ट्रीय योजना बनवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

ही मागणी विरोधकांकडून वारंवार होत आहे, पण कोरोनाचा लढा फक्त आम्हीच लढणार व आम्हीच जिंकणार या राजकीय ईर्षेपोटी राज्यकर्त्यांनी देशाचे स्मशान करून टाकले आहे व स्मशानात चितांचा वणवा भडकल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. देशात ज्या प्रकारच्या मृत्यूचे तांडव चालले आहे तो अमानुष प्रकार म्हणजे सामाजिक अपराध आहे आणि त्या अपराधाबद्दल कुणाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तेसुद्धा ‘डोळस’ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करायला हवे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

Rasika Jadhav

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

2 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

2 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

2 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

2 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

2 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

2 days ago