महाराष्ट्र

परिस्थिती बिकट आहे, सरकर कोणाचे हे पाहू नका; फडणवीसांना संजय राऊतांची खास विनंती

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राज्यात लसीचा तुटवडा देखील आहे एवढेच नाही तर ऑक्सिजन आणि बेडसची देखील कमतरता जाणवत आहे. ही परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी ते देखील महाराष्ट्राचे नेते आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजेत. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका उत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी हे आवाहन केले. परंतु, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुण्याला थेट लसींचा पुरवठा, हा तर महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्याय

केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचे ऐकले जात नाही, असा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले.

फक्त पुण्यातील भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचे किंवा तुमचे सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असे ही संजय राऊत यांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

11 mins ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 hour ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

1 hour ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

2 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

4 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

22 hours ago