महाराष्ट्र

ते स्वत:च्या तालावर नाचतात, निरुपमांचा राज ठाकरेंना टोला

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की, कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्य कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी निशाणा साधला आहे. “बहिरा नाचे आपन ताल!” म्हणजे “बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते” अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे.

राज ठाकरेंचा परप्रांतीयविरोधी सूर

मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असतानाही राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांविषयी कायम कणव बाळगला आहे. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंन कानपिचक्या लगावल्या.

कोरोना वाढीवर राज ठाकरेंची मीमांसा

“बाहेरच्या राज्यातून येणारी माणसे आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात” असे राज ठाकरे काल म्हणाले होते.

“राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतेय कोण जातेय हे कुणालाच माहीत नव्हते. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे” असे ही ते म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago