नाशिकमध्ये पंधरा दिवसातच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील २५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश १५ जानेवारी रोजी पोलीस आयुक्तांनी काढले होते. परंतु अवघ्या पंधरा दिवसात पोलीस आयुक्तालयातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. यात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कड यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात येऊन पदभार स्विकारला. पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी सहा ते सात महिन्यांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या १५ दिवसांपूर्वीच बदल्या करण्यात आल्या होत्या.

आता कुठे कामकाज आणि पोलीस ठाण्याची हद्द समजून घेत कामकाजाला सुरूवात केली नाही तोच पंधरा दिवसात पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी मुंबई येथून बदली होऊन आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कड यांनी यापुर्वी देखील पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणून कामकाज केले आहे. त्यामुळे कड यांना हद्दीतील गुन्हेगारांची व परिसराची बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे कामकाज करतांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच परिसरातील गुन्हेगारीवर देखील नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश मिळेल यात शंका नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे यांची देखील पंधरा दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेची जागा रिकामी आहे. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार सोपविण्यात येऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण माछरे यांच्या बदली बाबत कोणतेही आदेश नाही. मधुकर कड हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पदभार स्विकारताच पंचवटीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

नाशिक ग्रामीण पोलीस दलातही खांदेपालट करण्यात आल असून  मालेगाव कॅम्पचे दिलीप खेडकर यांची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील दत्तात्रय लांडगे यांची मनमाड पोलीस ठाण्यात, चांदवडचे रवींद्र जाधव यांची मालेगाव कॅम्पला व नियंत्रण कक्षातील श्रद्धा गंधास यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सुनील भाबड, दत्ता चौधरी यांची जिल्हा वाहतूक शाखेत, नव्याने हजर झालेले अरुण धनवडे यांची ओझर पोलीस ठाण्यात, नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांची नांदगाव पोलीस ठाणे, दिलीप राठोड यांची सिन्नर, राकेशसिंह परदेशी यांची दिंडोरी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ यांची लासलगावला, लासलगावचे अशोक मोकळ यांची नियंत्रण कक्षात, विजय सोनवणे यांची निफाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाचक म्हणून नेमणूक झाली आहे. नव्याने हजर झालेले हनुमान उगले यांची सिन्नरला, नांदगाव पोलीस ठाण्यातील कल्याणी पाटील यांची नियंत्रण कक्षात नेमणूक झाली आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago