लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सोमवारी रात्री शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संजय राऊत यांना भेटण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले आहेत. कालपासून राऊतांच्या भेटीसाठी रुग्णालयात रिघ लागली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी लिलावती रूग्णालयात जाऊन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, पवार आणि राऊतांमध्ये राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. त्यामुळे काही तरी वेगळं घडणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळल्यानंतर लिलावतीर रुग्णालयात प्रथम त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. सोमवारी दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या राऊतांच्या भेटीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची रिघ लागली आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…