महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या (Modi government) धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर ( S. Jaishankar ) यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. उत्तर मुंबईतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या डॉ. एस. जयशंकर ( S. Jaishankar ) यांनी बीकेसी येथील ‘एनएसई’ मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.(Under the Modi government, Mumbai is completely terrorism free; Minister of Foreign Affairs S. Jaishankar)

यावेळी डॉ. एस. जयशंकर म्हणाले, मोदी सरकारने (Modi government)  गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झाली, ते मतदार अनुभवतो आहे. मोफत आरोग्य उपचार घर, मुद्रा कर्ज, आणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहे. मोदींच्या काम करण्याच्या आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या हमीवर भाजपा मतदारांचे आशीर्वाद मागत आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले,कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेय, याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. भाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे असे डॉ. एस. जयशंकर म्हणाले.

भाजपा सरकारने कलम 370 हटवण्याचे काम केले.परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. एक दिवस तोही भारताशी जोडला जाईल, असा विश्वास डॉ. एस. जयशंकर ( S. Jaishankar ) यांनी व्यक्त केला. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे निर्णय घेतले.अनेक योजनांद्वारे व्यवसायवृद्धी घडवून आणल्याकडे श्री.जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आजमितीस देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. जनता त्याचा नक्कीच विचार करेल, असे डॉ. एस. जयशंकर  ( S. Jaishankar ) यांनी नमूद केले.

चीनच्या ताब्यात भारताची भूमी हे तर नेहरूंचे पाप

चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 या काळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर (Modi government) फोडत आहे. त्यांना का करत राहू द्या, आम्ही राजनैतिक मार्गाने आमचे काम करत राहू, असे डॉ. एस. जयशंकर ( S. Jaishankar ) यावेळी म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

54 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

5 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago