मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

टीम लय भारी

मुंबई : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली. भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत(Voter registration Extended till 5th December).

याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम

‘महाविकास आघाडी’ सरकारने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला : बाळासाहेब थोरात

डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने देखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही मदान यांनी केले आहे.

विधानपरिषदेसाठी १२ जागांची नावे अखेर राज्यपालांना सादर, जाणून घ्या उमेदवारांची नावे

Maharashtra State Election Commission launches ‘Mahavoter Chatbot’ to answer voter registration queries

मतदार नोंदणीसाठी ‘महाव्होटर चॅटबॉट’

राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती ‘महाव्होटर चॅटबॉट’या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.

Team Lay Bhari

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

22 hours ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago