महाराष्ट्र

Warakari : ‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत अन्यथा वारकरी संप्रदाय येणा-या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, ठाकरे सरकारला गंभीर इशारा

टीम लय भारी

पंढरपूर : कोरोना संकटामुळे गेल्या १७ मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीतकमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी वारकरी (Warakari) संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. (Warakari aggressive for ‘Karthiki’; Temple doors should be opened for Karthiki Yatra, otherwise Warkari sect will boycott all upcoming elections, serious warning to Thackeray government)

आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारक-यांना कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला येऊ द्यावे. प्रत्येक मठात ५० भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी आणि कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारक-यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे.

विठ्ठल मंदिर गेल्या ९ महिन्यापासून बंद असल्याने कार्तिकी एकादशीला मंदिराची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेता यावे, अशीही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. शासनाने आषाढी यात्रे प्रमाणेच कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणा-या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.

दरम्यान, कार्तिकी यात्रेसाठी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत यात्रेच्या सर्व परंपरा पाळण्यासाठी शासनाला एक प्रस्ताव देण्यात आला असून आषाढी प्रमाणे कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सपत्नीक निमंत्रण दिले जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. त्यात राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीही कार्तिकी यात्रेसाठी २६ नोव्हेंबर रोजी होणा-या कार्तिकी एकादशीला मंदिराच्या वतीने होणारी पाद्य पूजा, नित्य पूजा व शासकीय महापूजेला मर्यादित संख्येने वारक-यांना प्रवेश देण्यास परवानगी मिळावी आणि व कार्तिकी यात्रेत शेकडो वर्षांपासून होत असलेल्या विधी व परंपरा पाळाव्यात यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेला शासन परवानगी देणार की आषाढी प्रमाणेच संचारबंदी व कडक निर्बंध लादणार हे ठरायचे असले तरी वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देत एक पाऊल पुढे टाकले आहे. ऋतू बदलामुळे कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना कार्तिकी यात्रेला परवानगी देणे धोकादायक असले तरी वेळीच मध्यम मार्ग स्वीकारल्यास वारकरी संप्रदाय आणि शासन यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळता येणे शक्य होणार आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

37 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago