महाराष्ट्र

Corona : धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबद्दल राजेश टोपे काय म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope on Dhananjay Munde Health who tested COVID Positive)

“धनंजय मुंडे यांच्याशी मी नुकतेच बोललो. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अ‍ॅडमिट करणार आहोत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत आहे. पण सर्व नियंत्रणात आहे. ” अशी माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे संसर्गाची भीती नाही. पण लक्षण दिसली तर मंत्री क्वारंटाईन होतील” असंही राजेश टोपे म्हणाले.

बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, हे हाय रिस्क काँटॅक्ट नाहीत. नाहीतर अख्खं मंत्रीमंडळच क्वारंटाईन व्हावं लागेल. “आता सर्व सिस्टीम बदलल्या आहेत. पूर्वी चिकटून खुर्च्या असायच्या, आता किमान दोन मीटरचे अंतर ठेवले जाते, एक आड एक खुर्च्या असतात. कोरोनासोबत जगताना जी काळजी घ्यावी लागणार आहे, ती सर्व खबरदारी घेतली जाते. असं राजेश टोपे म्हणाले. पीए, ड्रायव्हर असे जे 24 तास सतत सोबत असतात, त्यांना आपण हाय रिस्क काँटॅक्ट संबोधतो. पण कोणा मंत्री किंवा अधिकाऱ्यांना शंका वाटली, तर त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केल्याचं बोललं जातं.

मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

राजीक खान

Recent Posts

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

42 mins ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

2 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

20 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

22 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

23 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago