महाराष्ट्र

“कुठून हे नग मिळतात?, जितेंद्र आव्हाड थेट माजी मुख्यमंत्रांवर भडकले…

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांची भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड थेट माजी मुख्यमंत्र्यावर भडकले (Jitendra Awhad directly attacked the former Chief Minister).

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी अजब वक्तव्य केले आहे. एकीकडे लोकांचे मृत्यू होत असताना आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊतांचा मोदींना खास सल्ला, दिलं महाराष्ट्र मॉडेलचं उदाहरण…

विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी; पाहा काय केलं पुढे…

दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरला त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे(Jitendra Awhad also shared a video of Trivendra Rawat on Twitter).

त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असे मत व्यक्त केले आहे. सोशल नेटवर्किंगवर त्रिवेंद्र सिंह यांचे हे वक्तव्य सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झाले आहे. म्युटेड करोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले.

Covid-19 deaths are declining among the elderly. Does it mean the vaccine effect is kicking in?

“तसे पाहिले तर कोरोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपण (मनुष्य) स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय,” असे त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी काय करावे लागेल यासंदर्भातही त्रिवेंद्र सिंह यांनी भाष्य केले आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावे लागणार आहे, असे त्रिवेंद्र सिंह म्हणाले आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

13 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

15 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

16 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago