महाराष्ट्र

Coronavirus : नितेश राणेंना कोण सांगणार ?

आमदार कपिल पाटील ( अध्यक्ष, लोक भारती )

‘कोरोना’ने ( Coronavirus ) सगळ्या जगाला संकटात टाकलंय त्यात भारत अपवाद नाही. सर्वाधिक रुग्ण अर्थात महाराष्ट्रातच आहेत. याचं कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इतकं मोठं संकट आणि धोका असताना महाराष्ट्र सरकार अक्षरशः प्राणप्रणाने लढतं आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण ज्या वाईट पद्धतीने टीका करताहेत त्याबद्दल बोललं पाहिजे.

शासनाच्या चुकांबद्दल टीका करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे. मात्र आता भाजपवासी झालेले आमदार नितेश राणे हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरत खालच्या पातळीवरची टीका करतात हे खेदजनक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्षरशः जीवावर उदार होऊन लढताहेत. त्यांच्या घराजवळचा चहावाला करोनाग्रस्त ( Coronavirus ) आहे. या चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे अनेक सुरक्षा कर्मचारी चहा पीत असत. त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.

याचा अर्थ खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचं कुटुंब संकटात असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत मंत्रालयात जातात. सह्याद्रीवर जातात. मंत्रिमंडळाची बैठक घेतात. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. लोकांशी बोलतात. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. हे न पाहता त्यांच्यावर इतक्या वाईट पद्धतीने टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही.

माझी नितेश राणे यांना विनंती आहे, राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर किमान इतक्या खालच्या पातळीवरची टीका त्यांनी करू नये. चुका दाखवाव्यात, टीका नंतर जरूर करता येईल. पण आज कोरोनाशी ( Coronavirus ) एकत्रितपणे लढावं लागेल.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार

AwhadVsBJP : ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार,  मुलीवर बलात्कार करू’

WHO ने कोरोनाबद्दल प्रसारित केलेली माहिती

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago