महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस ५ वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून तरी टिकून राहतील का?; जयंत पाटलांचा खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. ‘भाजप प्रचार करताना सांगतेय की, आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?’, असा सवाल करतानाच ‘पंढरपूर मंगळवेढा येथील जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील’, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आयोजित जाहीर प्रचारसभेत मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ५ वर्षे पक्षीय राजकारण केले. भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि आज फडणवीस येथे येऊन भाजपला मत द्या, सांगत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणतो, असेही म्हणत आहेत. अहो, मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील?, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहेत. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपद तरी पाच वर्षे टिकून राहील का?, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न, कारखान्यांचे प्रश्न, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरूपात आशीर्वाद द्या, असे आवाहनही जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढाकरांना केले.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढ्यात राजकारण चागलेच तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते दररोज एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आज एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गल्लोगल्ली फिरून प्रचार करताना दिसले तर दुसरीकडे जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी सभेला मोठी गर्दी केली होती.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago