Yashwant Sinha : नरेंद्र मोदींच्या गळ्यातील ‘गमछा’ आता जागतिक फॅशन होईल

टीम लय भारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. या भाषणावेळी त्यांनी आपल्या गळ्यात ‘गमछा’ गुंडाळला होता. त्यावर भाजपचे ज्येष्ठ बंडखोरे नेते यशवंत सिन्हा  ( Yashwant Sinha ) यांनी खिल्ली उडवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Yashwant  Sinha jibed on Narendra Modi.

‘नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ‘प्रशंसनीय’ असे तुम्हाला काय दिसते’ असा प्रश्न लोकांकडून मला विचारला जातो. मोदी यांच्यात ‘प्रशंसनीय’ अशा अनेक बाबी आहेत. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी परिधान केलेल्या ‘गमछा’चे मला भारी कौतुक वाटत आहे. लवकरच आता ही जागतिक फॅशन बनेल’ असा चिमटा सिन्हा ( Yashwant Sinha ) यांनी काढला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अर्थमंत्रीपदाची यशस्वी धुरा सांभाळलेले यशवंत सिन्हा सध्या भाजपमध्ये बेदखल आहेत. सिन्हा ( Yashwant Sinha ) सतत नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे आसुड ओढत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर सिन्हा यांनी देश पातळीवर आंदोलनेही केली आहेत.

‘लॉकडाऊन’मुळे स्थलांतरीत मजूर कुटुंबियांसह चालत आपल्या गावाकडे जात आहेत. भर उन्हात चालताना मजुरांना अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी मात्र या मजुरांना कसलाही दिलासा दिलेला नाही. त्या संदर्भानेही सिन्हा ( Yashwant Sinha ) यांनी ट्विटरवर आसूड ओढले आहेत.

मोदी यांनी एखादी आगळीवेगळी कृती केली की, त्यांचे समर्थक लगेच अनुकरण करतात. सहा वर्षांपूर्वी मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या ‘जॅकेट’ची फॅशन देशात लोकप्रिय झाली होती.

ट्विटरवर मोदी यांनी आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ हा शब्द जोडला होता. त्यावरही मोदी समर्थकांनी स्वतःच्या नावासमोर लगेच ‘चौकीदार’ लिहिले होते.

नरेंद्र मोदी यांच्या गळ्यातील नक्षीदार ‘गमछा’

मोदी यांनी आता नव्यानेच गळ्यात ‘गमछा’ घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे समर्थक त्याचेही अनुकरण करतील, आणि ती फॅशन बनवतील अशी बोचरी टीका सिन्हा यांनी केली आहे.

‘लॉकडाऊन’मध्ये अन्य प्रश्न महत्वाचे आहेत. पण मोदी समर्थकांना ‘गमछा’ची फॅशन अधिक महत्वाची वाटू शकेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न सिन्हा ( Yashwant Sinha ) यांनी केल्याचे दिसत आहे.

यशवंत सिन्हा हे नरेद्र मोदींना नेहमी ‘घरचा आहेर’ देत असतात

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Politics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा

Coronaeffect : मुंबईतील ‘कोरोना’ रूग्णसंख्येची वाटचाल 75 हजारांकडे

BJP Politics- एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली!

Vajpayee wanted to sack Modi in 2002, Advani stalled it

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

3 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

3 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

5 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

5 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

5 days ago