मंत्रालय

Amid Covid-19 Threat : पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट

टीम लय भारी

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट असताना (Amid Covid-19 Threat) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली. तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असे सांगण्यात येत आहे. मुंबईत होणा-या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणं शक्य नाही असे लक्षात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होतं. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.

याआधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोप-यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार, कोरोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते. दरम्यान ३ ऑगस्टपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र हे अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचं सांगितले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकरात लवकर संपवले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होते. पण कोरोनाच्या साथीला तोंड देण्यासाठी विधिमंडळाच्या कामकाजातून प्रशासनाला मुक्त करण्यासाठी १४ मार्चला अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, असे जाहीर झाले होते. मात्र, राज्यात कोरोनाची साथ कायम असल्याने सर्व यंत्रणा कोरोनानियंत्रण व इतर अनुषंगिक गोष्टींमध्ये गुंतल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन नेमके कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

अधिवेशन पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा : फडणवीस

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याला मोठा फटका बसला आहे. देशातल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे सरकारचे नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात मोठे नुकसान झालेय, सरकारची मदत तोकडी आहे, महापुरावेळी निकष बाजूला ठेवून मदत केली, यावेळीही सरकारने तसेच करावे, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

24 mins ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

1 hour ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

2 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

2 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

3 hours ago

संध्याकाळी व्यायाम करणे योग्य की नाही? जाणून घ्या

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…

4 hours ago