मंत्रालय

विधिमंडळ अधिवेशनाचा निर्णय उद्या होणार, कालावधी कमी होण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कशा पद्धतीने घ्यायचे याबाबत उद्या ( मंगळवारी) निर्णय होणार आहे ( Assembly session will be decided on tomorrow ). विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये अधिवेशनाचे स्वरूप निश्चित केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

अगोदरच्या नियोजनानुसार ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत तीन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार होते. पण ‘कोरोना’चा संसर्ग वाढतच चालला आहे. विधानभवनातही ‘कोरोना’ने घुसखोरी केली आहे ( Coronavirus entered in Vidhanbhavan ). त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी आणखी कमी केला जाऊ शकतो. अवघ्या एक दिवसाचे अधिवेशन आयोजित केले जाऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनासाठी सर्व आमदारांऐवजी साधारण १० टक्के आमदारांनाच उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. हे १० टक्के आमदार कोणते असावेत याबाबतही कामकाज सल्लागार समिती निर्णय घेईल. वयोवृद्ध व नवख्या आमदारांना अधिवेशनातून वगळले जाऊ शकते. दोन – तीन वेळा आमदार झालेल्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले ( Maharashtra Assembly session August 2020 ).

समितीची बैठक विधानभवनाबाहेर

‘कोरोना’च्या संसर्गामुळे विधानभवनात चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीची मंगळवारी होणारी बैठक ही विधानभवनाबाहेरील मोकळ्या जागेत घेण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने बाहेर बैठक होत आहे. विधानसभेची बैठक दुपारी ३ वाजता, तर विधानपरिषदेची बैठक ३.३० वाजता होणार आहे.

विधानभवनात ‘कोरोना’चा शिरकाव

‘कोरोना’ने मंत्रालयाप्रमाणे विधानभवनातही शिरकाव केला आहे. विधानभवनात नोकरी करीत असलेल्या किंवा विधानभवनात वावर असलेल्या पाच जणांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाली आहे. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ‘कोरोना’बाधित एका अवर सचिवांच्या पत्नीचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे सचिव शांताराम भोई यांना पाच दिवसांपूर्वी ‘कोरोना’ची लागण झाली आहे. रविवारी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. बनसोडे यांचे कार्यालय विधानभवनातच आहे. या दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.

आमदारांच्या निवासाची गैरसोय

‘कोरोना’महामारीमुळे चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे तीन दिवसांचे अधिवेशन ( Assembly Session 2020 ) आयोजित केले तर त्यांच्या निवासाची सोय कुठे करायची असा प्रश्न आहे. मनोरा आमदार निवासस्थान पाडलेले आहे. त्यामुळे अन्यत्र कुठे तात्पुरती सोय केली तर ‘कोरोना’च्या संसर्गाची भिती आहे. अनेक आमदारांनाही ‘कोरोना’ची लागण झालेली आहे. अधिवेशन कालावधीत मंत्री व आमदारांसोबत त्यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा येतील. परिणामी गर्दी आणखी वाढेल. त्यामुळे एकाच दिवसाचे अधिवेशन आयोजित केले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

12 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

12 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

13 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

15 hours ago