मंत्रालय

मंत्रालयात अधिकाऱ्यांना कामच नाही, पण ‘हे’ कर्मचारी कामाने बेजार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’मुळे मंत्रालयातील प्रशासकीय कारभार जवळपास ठप्प झाला आहे ( Coronavirus affected to work in Mantralaya ). पाच – सहा विभाग वगळता कोणत्याच खात्यांमध्ये १५ – २० टक्के सुद्धा काम उरलेले नाही. पण असा एक कर्मचारीवर्ग आहे की, जो कामाने प्रचंड बेजार झाला आहे.

कामाने बेजार झालेले कर्मचारी आहेत, सफाईगार. ‘कोरोना’मुळे दर दोन तासांनंतर कार्यालयांमध्ये साफसफाई करावी असे सरकारने आदेश दिलेले आहेत. सरकारी तसेच खासगी कार्यालयांनाही हे आदेश लागू आहेत. मंत्रालयात व्हरांडे साफ करण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिलेले आहे. पण कार्यालयांच्या आतील साफसफाई सफाईगारांकडूनच केली जाते ( Sweepers has workload in Mantralaya due to Coronavirus ) .

खासगी कंपन्यांनी पुरेसे कर्मचारी उपलब्ध केलेले आहेत. शिवाय कामही कमी आहे. व्हरांडे लांबलचक असल्यामुळे मशीनच्या सहाय्याने स्वच्छता करणे शक्य होते. पण कार्यालयाच्या आत सफाईगारांना स्वच्छता करताना नाकीनऊ येत आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

PoliceDuty : मंत्रालयातील 1400 कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी

मंत्रालयातील कामांसाठी आमदार पत्नीच्या सोबतीने करतात पाठपुरावा

जुन्या व विस्तारीत इमारतीत एका माळ्यासाठी जेमतेम चार – पाच सफाईगार उपलब्ध आहेत. एकेका माळ्यावर १०० तरी कार्यालये असतील. या कार्यालयांमध्ये दर दोन तासांतून स्वच्छता करणे केवळ अशक्य आहे. पण ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी बिचारे सफाईगार प्रचंड राबत आहेत  ( Sweepers doing too much work to control Coronavirus in Mantralaya ).

हे सफाईगार कामाच्या बोझ्यामुळे अक्षरशः घायकुतीला आले आहेत. त्यांचे काम हलके व्हावे म्हणून सरकारनेही काहीच ठोस पावले उचलली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना मात्र कामच नाही

सध्या मंत्रालयात साधारण १० टक्केच अधिकारी व कर्मचारी कामावर येत आहेत. यांत सचिव पदांवर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी, विविध खात्यांतील सह सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी, सहायक, लिपीक इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंत्री कार्यालयातील मोजके अधिकारी व कर्मचारीही अधूनमधून कामावर येत असतात.

विविध आदेश निर्गमीत करणे, विविध फाईल्सची कामे करणे, धोरणात्मक व वित्तीय कामांबाबत निर्णय घेणे अशी प्रशासकीय कामे मंत्रालयात होत असतात. पण ‘कोरोना’मुळे ही सगळी कामे ठप्प आहेत. परिणामी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला कामच उरलेले नाही ( No work for officers in Mantralaya ).

निधी नाही, मंत्रीही नाहीत

सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. पैसाच नसल्याने प्रशासकीय कामांबाबत निर्णय होत नाहीत. दुसऱ्या बाजूला मंत्रीसुद्धा मंत्रालयात फिरकत नाहीत. नवीन फाईल्स तयार होत नाहीत, अन् जुन्या फाईल्सवर कोणतीही कार्यवाही होत नाही, असे चित्र आहे.

‘या’ खात्यांतच सुरू आहे हालचाल

मंत्रालयात मोजक्याच खात्यांमध्ये कामांच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये आरोग्य, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय, कृषी, नगरविकास, महसूल, शिक्षण, कामगार व उद्योग या कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांमध्येही अनेक डेस्क बंद आहेत. मोजक्याच डेस्कचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ढोबळमानाने मंत्रालयात निधीशी निगडीत ५० टक्के कामे होत असतात. धोरणात्मक बाबींशी निगडीत २० टक्के कामे होतात, तर सेवांविषयक ३० टक्के कामे होतात. परंतु या तिन्ही प्रशासकीय कामांवर परिणाम झाला आहे. ‘कोविड’शी निगडीत अधिकारी व कर्मचारी वगळले तर कुणाच्याच हाताला काम नाही. सफाईगारांचे काम मात्र नेहमीपेक्षा चार – पाच पटीने वाढल्याची माहिती या सूत्रांनी दिली.

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago