चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली पोझ
टीम लय भारी
सांगली : लाईट्स… कॅमेरा… स्माईल… असा कोणताही बडेजाव नसणारा अत्यंत साधा मात्र आगळा वेगळा फोटोशूट (Photosession) आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे पार पडला. फोटोग्राफर होते ते ६ वर्षीय नवेखेड येथे राहणारे रुद्र सागर जंगम तर मॉडेल होते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील.
झालं असं की आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे मंत्री जयंत पाटील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघात दौ-यावर होते. वाळवा तालुक्यातील नवखेड येथे मंत्री महोदयांचा ताफा पोहोचताच रुद्र सागर जंगम हा चिमुकला, मंत्री जयंतरावांकडे गेला आणि म्हणाला… “साहेब.. मला आपला फोटो काढायचा आहे…” मंत्री जयंत पाटील यांनाही त्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी होकार दिला. मग काय गड्याने जो फोटो काढला त्याला दाद देण्याशिवाय मंत्री महोदयांनाही राहवलं नाही. आणि बरं का… श्री. रुद्र जंगम यांना मंगलाष्टकाही तोंडपाठ आहे… फोटो शेसन संपताच लागलीच गड्याने मंत्री महोदयांना मंगलाष्टकाही म्हणून दाखवली आणि मंत्री महोदयांसह उपस्थितांची वाह वाह मिळवली.
राजकारणात चेहरा फार महत्वाचा. ज्या पक्षाकडे चेहरे त्याच पक्षाला सर्वाधिक मते हे जणू समीकरणच. फ्लेक्सवर रुबाबदार मोठा असलाच पाहिजे अशी नेत्यांची इच्छा असते. त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मात्र इस्लामपूरात पार पडलेला हा आजचा फोटो सेशन ह्रदयाला भिडणारा आहे, यात शंकाच नाही.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…