मंत्रालय

अजित पवार हेच सरकारमध्ये पावरफुल; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार यांना अर्थ खाते देण्यावरून गेल्या 12 दिवसापासून खातेवाटप रखडले होते. ही बाब अमित शहा यांच्या दरबारात पोहचल्यानंतर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे राहील, असे ठरले होते. त्यानुसार अजित पवार अखेर अर्थमंत्री झाले.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ही खाती असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

हे सुद्धा वाचा

फडणवीस यांनी डाव मांडला, पण हुकुमाचे पत्ते दूर सारले

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी उड्डानानंतर मोदींच्या शुभेच्छा

आमदार अपात्रतेबाबत चालढकल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भोवण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाची नोटिस

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ खालीलप्रमाणे

1 राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
2 सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
3 चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
4 विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
5 गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
6 सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
7 रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
8 मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
9 अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
—-
  

10 छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
11 दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
12 हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
13 धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
14 धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
15 कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
16 संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
17 अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

18 गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
19 दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
20 संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
21 संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
22 उदय रविंद्र सामंत- उद्योग
23 प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
24 अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
25 दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
26 शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

विवेक कांबळे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

13 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

14 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

16 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

16 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

17 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

17 hours ago