मंत्रालय

अजितदादांच्या ‘संपर्का’तील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, अन्य मंत्र्यांची पाचावर धारण

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ काळातही बैठका व भेटीगाठीचा सपाटा चालू ठेवलेले राज्यमंत्री संजय बनसोडे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे ( Sanjay Bansode tested Corona Positive ). बनसोडे यांनी अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांचीच आता पाचावर धारण बसली आहे.

संजय बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मर्जीतील मंत्री आहेत. अजितदादांना ते सतत भेटत असतात. ‘कोरोना’ काळातही ते अजितदादांना वारंवार भेटले आहेत. याशिवाय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांना ते भेटले आहेत. मंत्रालय उपलब्ध असलेल्या प्रत्येक मंत्र्यांकडे ते भेटायला जायचे ( Sanjay Bansode has met Ajit Pawar and many more ministers and officers ).

संजय बनसोडे हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. त्यामुळे भरपूर काम करण्याची त्यांना हौस आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या काळातही ते शांत बसत नव्हते. मंत्रालयात जे मंत्री उपलब्ध असतील त्यांच्याकडे ते जाऊन बसायचे. अधिकाऱ्यांकडेही जाऊन बसायचे. ‘जनहिता’ची, मतदारसंघातील कामे पूर्ण करण्यासाठी ते आग्रह धरायचे. मतदारसंघातील अधिकाऱ्यांच्याही त्यांनी बैठका घेतल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयातील ‘या’ IAS अधिकाऱ्याने ‘कोरोना’च्या लढाईत उपसले प्रचंड कष्ट, आता झाली बदली

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, महिला खासदारही ‘कोरोना’बाधित

बनसोडे यांनी महत्वाच्या कामांची लांबलचक यादी बनविली आहे. या यादीतील कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित मंत्री, त्या खात्याचे सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते पाठपुरावा करायचे. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा करायचे. बनसोडे यांचे कार्यालय विधानभवनात आहे. त्यामुळे ते विधानभवनात अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याऐवजी स्वतःच मंत्रालयात यायचे. मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना भेटायचे.

‘कोरोना’ काळात अन्य मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना भेटायला जाणाऱ्यांमध्ये संजय बनसोडे यांचा क्रमांकावर वरचा आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीगाठीच्या सपाट्यामुळे अन्य मंत्री व अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

दरम्यान, सौम्य ताप व घशामध्ये खवखव होत असल्याने बनसोडे यांनी हिंदूजा रूग्णालयात शनिवारी तपासणी केली होती. दुर्दैवाने त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे त्यांना आता ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे ( Sanjay Bansode admitted in Breach Candy hospital ). बनसोडे यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्य़ांनी तातडीने स्वतःला होम कॉरन्टाईन करून घेतले आहे.

‘मागील चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी होम कोरन्टाईन व्हावे. उदगीर, लातूर व उस्मानाबाद येथे घेतलेल्या बैठकांमधील अधिकारी व कार्यकर्त्यांनीही स्वतःला होम कोरन्टाईन करून घ्यावे व त्रास वाटल्यास वैद्यकीय तपासणी करावी’, असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

कामांच्या पाठपुराव्यासाठी मी धावपळ केली होती. त्यातून कुणाच्या तरी मार्फत अनवधानाने ‘कोरोना’चे संक्रमण झाले असावे, अशीही शक्यता बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.

ठाकरे सरकारमधील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, अब्दुल सत्तार या पाच मंत्र्यांना यापूर्वीच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. बनसोडे हे ‘सहावे’ कोरोना संक्रमित मंत्री आहेत ( Corona Positive ministers in Thackeray Government ).

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago