मंत्रालय

Maharashtra Chief Secretary Name : शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी एकमताने मुख्य सचिव नियुक्तीचा घेतला निर्णय

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार पदी नियुक्ती केली. हा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी एकमताने ( Sharad Pawar and Uddhav Thackeray unanimously appointed Sanjay Kumar as Chief Secretary of Maharashtra )  घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्य सचिव पदासाठी संजयकुमार व सिताराम कुंटे या दोघांचीही नावे चर्चेत होती. पण संजयकुमार यांची सेवा ज्येष्ठता कुंटे यांच्यापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या बाजूला मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही संजयकुमार यांच्या नावाला संमती दर्शविली होती. त्यामुळे पवार व ठाकरे यांनीही संजयकुमार यांनाच झुकते माफ दिले.

अजोय मेहता यांना मुख्य सचिव पदासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली नाही. परंतु मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय सुद्धा शरद पवार, उद्धव ठाकरे व अजितदादा यांनी एकमताने घेतला.

अजोय मेहता यांच्या विरोधात काही मंत्र्यांच्या तक्रारी होत्या. परंतु मेहता यांच्या कामावर उद्धव ठाकरे कमालीचे प्रभावित झालेले होते. कोरोना व्हायरसच्या या काळात मेहता यांनी अफाट कष्ट उपसले आहेत. त्यांनी प्रशासकीय यंत्रणा योग्य प्रकारे हाताळली आहे अशी उद्धव ठाकरे यांची भावना आहे ( Ajoy Mehta has done good work in corona pandemic ).

दुसऱ्या बाजूला अजोय मेहता यांचे गेल्या कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे, शरद पवार व अजितदादा यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेही मेहता यांच्यासाठी प्रधान सल्लागार हे नवे पद तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

संजयकुमार हे कार्यक्षम आहेतच, पण ते उपद्रवी नाहीत. सरळमार्गी आपल्याकडील कामाची जबाबदारी पार पाडणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख जातात. आतापर्यंत ते कधीच कोणत्याच वादात अडकलेले नाहीत. त्यामुळे मुख्य सचिवपदासाठी पवार व ठाकरे यांनी संजयकुमार यांना पसंती दिल्याचे बोलले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

मुख्य सचिव पदावर संजयकुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्री कार्यालयात

Corona update :  बेस्ट,पोलीसानंतर एसटीच्या कर्मचा-यांनाही कोरोना!

Sharad Pawar : शरद पवारांचा टोला; ‘ऑक्सफर्ड’नेही परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना अधिक माहिती असेल!

Cyclone Nisarga : शिवरायांच्या रायगडाला वादळ पचवणे काही नवीन नाही : उद्धव ठाकरे

शिक्षण खात्यात संजयकुमार यांचे प्रभावी काम

शालेय शिक्षण व उच्च – तंत्र शिक्षण खात्याचे सचिव व नंतर प्रधान सचिव म्हणून संजयकुमार यांनी बरीच वर्षे काम केले होते. सीबीएसई, आयसीएसई व एसएससी या तिन्ही बोर्डांच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देताना गुणवत्ता यादीच्या निकषांवरून सन २००६ ते २०१० अशी चार वर्षे प्रचंड वाद होते.

या कालावधीत प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला वादंग उठायचे. या कालखंडात वसंत पुरके, राधाकृष्ण विखे – पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेबत थोरात हे शिक्षणमंत्री होते. अकरावी प्रवेशाच्या या मुद्यांवरून वसंत पुरके व विखे – पाटील यांना कमालीचा त्रास झाला होता.

शैक्षणिक वादंगांमुळे वसंत पुरके यांचे तर राजकीय करिअरच संपुष्टात आले. प्रवेशाची समस्या सुटलेली नसतानाच विखे – पाटील यांनी अकरावीचे सगळे प्रवेश ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. पण सर्व्हर व प्राधान्यक्रम यादीतील त्रुटी यामुळे हा निर्णय सुद्धा सलग दोन वर्षे वादात सापडला होता.

शालेय शिक्षण विभाग हा राज्य सरकार पुढील अत्यंत किचकट विषय बनला होता. मंत्र्यांचे करिअर बिघडवणारे खाते अशी प्रतिमा शिक्षण विभागाची झाली होती. याच दरम्यान विलासराव देशमुख यांना हटवून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. चव्हाण यांनी शिक्षणमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांना नव्याने जबाबदारी दिली.

थोरात आणि संजयकुमार यांनी त्यावेळी शालेय शिक्षण विभागात असे काही निर्णय घेतले की, या खात्यातील सगळे वाद संपुष्टात आले. संजयकुमार यांनी त्यावेळी खात्याचे प्रमुख म्हणून शिक्षण खात्याला वादंगातून बाहेर काढले. त्यानंतर गेली अनेक वर्षे या खात्यामुळे मंत्री किंवा सचिवांना त्रास झालेला नाही. त्याचे श्रेय बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच संजयकुमार यांना जाते.

अजोय मेहतांची उद्धव ठाकरे, अजितदादांशीही जवळीक

अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून जवळपास तीन वर्षे काम पाहिले होते. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मेहतांसोबत उत्तम संबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर ठाकरे यांनी मेहता यांनाच मुख्य सचिव पदावर कायम ठेवले. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ सुद्धा दिली.

मेहता यांची दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात विशेष बाब म्हणून नियुक्ती दिली आहे.

अजित पवार ऊर्जामंत्री असतानाच्या काळात अजोय मेहता महावितरणमध्ये होते. पवार यांच्या मर्जीतील ते अधिकारी होते. त्यामुळे अजितदादाही अजोय मेहतांबाबत सकारात्मक होते. त्यामुळेच मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

13 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

14 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

15 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

15 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

15 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

18 hours ago