बिग बॉस’ लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. पण तितकाच वादग्रस्तही आहे. त्यामुळे प्रेक्षकही दरवर्षी या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. बिग बॉसचं १४ वं पर्व आज ३ ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
दरम्यान यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’चं घर आतुन कसं असेल? याची एक झलक कलर्स वाहिनीने दाखवली आहे. त्यांनी घराचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे यंदाच्या वर्षी बिग बॉसच्या घरात मॉल, स्पा आणि चित्रपटगृह देखील असेल.
वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. या घरात कोणाला प्रवेश मिळणार? यंदाची थीम काय असणार? याबाबतच्या चर्चांना अनेकदा उधाण येत. त्यातच आता ‘बिग बॉसचं १४ वं पर्व आज ३ ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘बिग बॉस १३’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलंही होतं. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी? याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम सोशल डिस्टंसिंग असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस १४’च्या पर्वामध्ये सोशल डिस्टंसिंग ही थीम पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…