Categories: सिनेमा

‘गर्ल्स’चा महाराष्ट्र दौरा

ज्योत्स्ना कुलकर्णी : लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलींचे भावविश्व उलगडणारा ‘गर्ल्स’ हा विशाल देवरुखकर दिग्दर्शित चित्रपट नुकताच सर्वत्र चित्रपट प्रदर्शित झाला असून याला तरुणाईसह सगळ्यांचाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये जरी मुलींची धमाल, मजामस्ती, स्वच्छंदी आयुष्य दाखवले असले तरी या चित्रपटातून बोध घेण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. अर्थात त्या चित्रपट पाहिल्यावरच कळतील. ठिकठिकाणी ‘गर्ल्स’ चित्रपटाची चर्चा होत असतानाच चित्रपटातील ‘गर्ल्स’ अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर आणि त्यांच्यासोबत पार्थ भालेराव, विशाल देवरुखकर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहेत.
काही दिवसांपूर्वीच या ‘गर्ल्स’नी मुंबईतील एस्सेलवर्ल्डमध्ये जबरदस्त राडा घातला होता. दिवसभर त्यांनी या अम्युझमेंट पार्कमध्ये उपस्थितांसोबत, मीडियासोबत तुफान मजामस्ती केली. अशीच धमाल महाराष्ट्रभर करण्यासाठी या ‘गर्ल्स’नी आपला मोर्चा विविध शहरांकडे वळवला. अवघ्या महाराष्ट्राचा त्यांनी या काळात दौरा केला. औरंगाबाद, जालना, नाशिक, कोल्हापूर, इस्लामपूर, जयसिंगपूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे अशा पंधराहून अधिक शहरांना त्यांनी भेट दिली आणि फक्त भेटच नाही दिली तर तिथल्या स्थानिकांशीही त्यांनी आपुलकीने गप्पा मारल्या. त्यांच्यासोबतही मजामस्ती केली, ‘गर्ल्स’च्या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव शेअर केले. याबरोबरच या ‘गर्ल्स’नी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत, चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनाही केली होती. याव्यतिरिक्त महाराष्ट्र, मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या काही महाविद्यालयांनाही ‘गर्ल्स’नी भेट दिली. तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याबरोबर धमाल केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ठिकठिकाणी त्यांचा हा दौरा सुरु आहे. काही थिएटर्सना भेट देऊन प्रेक्षकांना चित्रपटाबाबतच्या प्रतिक्रिया विचारल्या. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले. विशेष म्हणजे हा प्रवास त्यांनी आपल्या खासगी गाडीने न करता सगळ्यांनी एकत्र एका बसने केला, जी बस ‘गर्ल्स’च्या पोस्टरने सजवली होती. ही ‘गर्ल्स बस’ सुमारे सहा हजार किलोमीटरहून अधिक फिरली.
या चित्रपटात या ‘गर्ल्स’ व्यतिरिक्त पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर स्वानंद किरकिरे यांनी छोटीशी तरीही महत्वपूर्ण अशी भूमिका साकारली आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
हे सुद्धा वाचा
तुषार खरात

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

4 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

7 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago