सिनेमा

Kylie Jenner : काय सांगता ! होय, एका फोटोशुटसाठी ‘ही’ अभिनेत्री घेते तब्बल 200 कोटी

टिम लय भारी

मुंबई : हॉलिवूड सुपरस्टार आणि मॉडेल कायली जेनर (Kylie Jenner) अ‍ॅक्टींगसोबत आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. कायलनी नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फेटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. कायलीनं फोटो टाकायचा उशीर असतो की, क्षणात तो फोटो व्हायरल होतो. फोर्ब्सनं नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी (Highest Paid Celeb 2020) जाहीर केली आहे. या यादीत कायलीनं पहिला क्रमांक मिळवला आहे.

वयाच्या 23 व्या वर्षी 2020 मध्ये कायलीनं तब्बल 540 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 39 अब्ज रुपयांची कमाई केली आहे.

कायलीला अभिनयात जास्त प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली. या क्षेत्रात तिला प्रचंड यश मिळालं. आज ती जगातील सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल म्हणून ओळखली जाते. एका इंग्रजी वृत्तानुसार एका फोटोशुटसाठी ती जवळपास 200 कोटी रुपये एवढं मानधन घेते.

कायलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2007 साली कीपींग अप विथ द कर्दाशियन या मालिकेतून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर तिनं मिलयन डॉलर क्लोसेट, डिल विथ इट, आय एम कॅट, लाईफ ऑफ किली अशा अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केलं. आज ती जगातील यशस्वी मॉडेलपैकी एक आहे. कायली जगातील सर्वात कमी वयाची अरबपती आहे. फोर्ब्सच्या 2019 च्या यादीत सर्वात श्रीमंत लोकांमध्ये कायलीनं 2057 वा क्रमांक मिळवला होता.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

16 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

18 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago