Categories: सिनेमा

मकरंद देशपांडेचे मराठी रंगभूमीवर आगमन

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहिणारे मकरंद देशपांडे आता मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सर, प्रेमाचं काय करायचं !’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मकरंद देशपांडे मराठी रंगभूमीवर अभिनय करताना दिसणार आहेत.

आजवर अनेक मराठी नाटकांसाठी लेखन केल्यानंतर ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ या नाटकात मकरंद मुख्य भूमिका साकारणार आहेत. नाटकाच्या नावावरून हे नाटक ‘प्रेम’ या भावनेवर असणार हे नक्की.  प्रेम आपल्याला शिकवले जाऊ शकत नाही. प्रेम अगदी सहजच होते. प्रेम विसरता येणे सोपे नसते. प्रेम आपल्यासाठी उपयुक्त सुद्धा असते. असे हे प्रेम एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकावर केले तर काय होईल? याच प्रश्नाचे उत्तर ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ नाटक पाहिल्यावर आपल्याला मिळणार आहे.

आपल्या पहिल्या मराठी नाटकाच्या अनुभवाबद्दल मकरंद सांगतात, ‘मी अभिनयाची सुरुवात आंतरमहाविद्यालयीन रंगभूमीवरून केली. त्यानंतर ३० वर्ष मी हिंदी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती करत त्या नाटकांमध्ये अभिनयही केला. या सर्व हिंदी नाटकांचे गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कोलकाता, दिल्ली आदी ठिकाणी प्रयोग झाले. प्रयोगांच्या निमित्ताने संपूर्ण भारत देश पालथा घातला. मात्र आता मला असे वाटले की, मला माझ्या मातृभाषेतील नाटकात अभिनय करायचा आहे. मी अभिनय करत असलेल्या पहिल्या मराठी नाटकाचे प्रयोग मला संपूर्ण महाराष्ट्रात करायचे आहेत. याच अट्टाहासाने मी माझे आवडते नाटक, माझे आवडते कलाकार, तंत्रज्ञांसोबत माझ्या मायबाप प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’. माझ्या हिंदी नाटक, चित्रपटांवर प्रेक्षकांनी जसे भरघोस प्रेम केले तसेच प्रेम माझ्या मराठी नाटकावर देखील करतील याची मला खात्री आहे.’

मकरंद देशपांडे नाटकवाला आणि व्ही.आर. प्रोडक्शन सादर करत असलेल्या  ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांनी केले आहे. या नाटकात मकरंद देशपांडे यांच्यासोबत अजय कांबळे, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, निनाद लिमये, अनिकेत भोईर दिसणार आहेत. ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या १९ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. तर दुसरा प्रयोग २१ डिसेंबरला मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिर येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

या नाटकासाठी अमोघ फडके यांनी प्रकाशयोजना पाहिली असून शैलेंद्र बर्वे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. तर टेडी मौर्य यांनी नेपथ्य पाहिले आहे. या नाटकाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत राजीव देशपांडे दिसणार आहेत.

तुषार खरात

Recent Posts

बराच वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास होतो का? मग आजपासून करा ‘हे’ सोपे व्यायाम

ऑफिस असो की घर, सततच्या कामामुळे आपल्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदना होतात. दिवसभर…

38 mins ago

सिक्स पॅक ऍब्स मिळवण्यासाठी करा ‘हा’ व्यायाम, जाणून घ्या

पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आहारासोबतच व्यायामही आवश्यक आहे. यासाठी सिट-अप हा जुना पण प्रभावी व्यायाम…

1 hour ago

Prithviraj Chavan यांनी भरपूर कामे केली, Atul Bhosle यांनी नुसतेच फलक लावले | कराडात हवा कुणाची ?

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

17 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

18 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

19 hours ago