Categories: सिनेमा

‘मेकअप’मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी

लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनय कौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या चित्रपटातून गणेश पंडित यांनी आपले पाऊल दिग्दर्शनाकडे वळवले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मेकअप’ या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. त्याची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता या चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून या धमाल टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग निर्मित आणि केतन मारू, कलीम खान सहनिर्मित या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टिझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे. रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातही रिंकूचा बिनधास्त अंदाज दिसत असून तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. रिंकू आणि चिन्मयच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळेल. चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तुषार खरात

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

7 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

8 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

8 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

9 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

10 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

11 hours ago