Categories: सिनेमा

‘रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे’ अशी मागणी करत २७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

टीम लय भारी

मुंबई : ज्ञात-अज्ञात अशा सर्व पितरांच्या ऋणांचे स्मरण पितृपंधरावड्यात केले जाते. त्यांच्यामुळे आपण आहोत, याची जाणीव ठेऊन हे स्मरण केले जाते. कलेची जोपासना करणार्‍या रंगकर्मींना कलेचा ठेवा आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे. असंख्य प्रतिभावान कलावंतानी त्यांच्या कलांनी आपली संस्कृती जपली, वाढवली. आजची परिस्थिती पाहून जे कलावंत आज हयात नाहीत त्यांनाही नक्कीच वेदना झाल्या असतील. त्यांच्या स्मृती जागवत कलेचा जागर पुन्हा सर्वत्र व्हावा यासाठी पितृपक्ष पंधरवड्यातील सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील रंगकर्मींनी आपापल्या जिल्ह्यात रंगकर्मी आंदोलनाचा भाग म्हणून ‘पितृस्मृती’ श्राद्धविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे (Rangkarmi Theatre personalities from Maharashtra have decided to organize ‘Pitra Smriti’ shradh vidhi programme).

 

मुंबईतील रंगकर्मी २७ सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता दादर, शिवाजी पार्क येथे जमून पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान विधी करणार आहेत

शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ का बोलले जाते, जाणून घ्या

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी अख्ख्या महाराष्ट्रात ‘जागर रंगकर्मींचा’ हे आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्री महोदयांनी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र संघाला भेटीला बोलावले होते आणि त्यांच्या मागण्यांना तत्वत: मान्यता दिली होती. परंतु अद्याप त्या संबंधीचा लेखी, सरकारी अध्यादेश काढलेला नाही (Rangkarmi Theatre workers of Maharashtra, On August 9 2021, revolution day, there was a ‘Jagar Rangakar’ agitation across Maharashtra).

महाराष्ट्रातील रंगकर्मींनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सरकारने सुरु करावी यासाठी नटराजाची महाआरती आयोजित केली होती. त्याची दखल घेऊन ‘नाट्यगृह ५ नोव्हेंबर पासून चालू होतील’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रंगकर्मींना मान्य नाही (Rangkarmi Theatre was organized The Mahaaarti of Nataraja on August 30, 2021).

२७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

चहाचा इतिहास ! चहा पिल्यामुळे टिळकांवर पडला होता बहिष्कार, गंगेत डुबकी मारून आले होते…

Kangana Ranaut: Maharashtra government will keep theatres shut till film industry’s theatre culture completely disappears

‘राज्याचं सांस्कृतिक खातं आम्हां रंगकर्मींसाठी काहीही करीत नाही’, अशी ठाम समजूत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींची झाली आहे आणि यामुळे रंगकर्मींची बाजू सरकारकडे न मांडणारे, रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे, या सरकारमध्ये आपला कुणीही वाली नाही असा विचार जोर धरु लागला आहे. लोकरंजनातून समाजाचे प्रबोधन करणार्‍या कलावंताना आणि कलाप्रकारांना पूर्वीपासून लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला आहे. मात्र सध्या हा राजाश्रय दुरापास्त झाला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वैष्णवी वाडेकर

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago