सिनेमा

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

टीम लय भारी

मुंबई :- पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या कारणावरून अटक केल्यानंतर आता शिल्पाच्या कामात अडचणी येत आहेत. सध्या शिल्पाचा हंगामा 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो अपयशाच्या सावटाखाली दिसत आहे. याच कारणावरून शिल्पाने आता सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे (Shilpa Shetty new film is on the verge of failure).

शिल्पाने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हंगामा 2 या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत एक भावनिक विनंती केली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे, ” मी योगाच्या शिकवणीवर विश्वास ठेवते आणि त्यानुसार आचरण करते. अशी एक मात्र जागा आहे ज्यात जीवनाचे अस्तित्व आहे ते म्हणजे वर्तमानकाळ. हंगामा 2 या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर आज मी तुम्हा सर्वांना विनंती करते की हंगामा 2 तुमच्या परिवारासोबत पाहा. जेणेकरून तुमच्या व चित्रपटाशी संबंधित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल. धन्यवाद.” असे शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिल्पा शेट्टीचाही पतीसोबत सहभाग आहे का?; पोलीसांनी केली सहा तास चौकशी

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राबरोबर परप्रांतीय उमेश कामत आरोपी, बदनामी मात्र मराठमोळ्या उमेश कामतची !

सध्या पतीच्या अटकेमुळे शिल्पाला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे व तिच्यावर तिच्या चाहत्यांकडून नाराजी  व्यक्त केली जात आहे. याचाच परिणाम शिल्पाच्या कामात होताना दिसतोय. पतीच्या अटकेमुळे तिने शूटिंगला जायचे देखील टाळले होते. सुपर डान्सर 4 या डान्सच्या रिॲलिटी शोची ती परीक्षक आहे. परंतु राज कुंद्राच्या अटकेमुळे तिने शूटिंगला जाणे टाळले (Due to the arrest of Raj Kundra, she avoided going to the shooting).

यापूर्वीही शिल्पाने इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला होता. ज्यात जेम्स थर्बर यांनी लिहिलेली वाक्ये होती. आता शिल्पा शेट्टीच्या या भावनिक पोस्ट नंतर प्रेक्षकांचा हुंगामा 2 या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतोय हे बघणे गरजचे आहे.

शिल्पा शेट्टी

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

“‘Erotica’ Is Not ‘Porn’, My Husband Innocent”: Shilpa Shetty To Police

हंगामा 2 चित्रपट

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा’  या चित्रपटाचा हा रिमेक आहे. हंगामा 2 हा चित्रपट २३ जुलै २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे.

या चित्रपटात शिल्पा शेट्टी,  मिझान जाफरी,  प्रणिता सुभाष,  राजपाल यादव,  आशुतोष राणा,  जॉनी लिव्हर आणि परेश रावल यांसारख्या अभिनेत्यांच्या भूमिका आहेत.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago