सिनेमा

सोनू सूद लसीकरणाच्या माध्यमातून करणार जनजागृती…

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अभिनेता सोनू सूद याने ही आज पंजाबमधील अमृतसर येथे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच त्याने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवातही केली आहे. या मोहिमेला त्याने ‘संजीवनी’ असे नाव दिले आहे.

‘संजीवनीः अ शॉट ऑफ लाईफ’ या नावाने सोनूने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम तो करणार आहे.

याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, “लोक अजूनही विचार करत आहेत लस घ्यायला हवी की नको. त्यामुळे या विषयावर जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. म्हणून मला ही मोहिम सुरु करावीशी वाटली. प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या सदस्यांना, जे कोणी लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांना लस घेण्यासाठी उद्युक्त करायला हवे. यामुळे आपण भविष्यात ज्या समस्यांना तोंड देणार आहोत, त्यासाठी मदत मिळेल.”

तो पुढे म्हणाला, “पंजाबमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच गावांमध्ये आम्ही सध्या ही मोहिम राबवत आहोत. इतर ही अनेक राज्यांमध्ये काम सुरु आहे. लोकांमध्ये जागरुकता नसल्याने लस घ्यावी की, नाही याबद्दल लोक अजूनही संभ्रमात आहेत. म्हणूनच मला सर्वांसमोर लस घ्यायची होती आणि सर्वांना हा संदेश द्यायचा होता की, जास्त विचार करत बसू नका. अनेक शिबिरांच्या माध्यमातून आम्ही हे काम करू. या चळवळीच्या साहाय्याने आम्हाला लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायची आहे.” करोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रत्येक भारतीयापर्यंत योग्य ती माहिती पोचवण्याचे काम ही मोहिम करणार आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 mins ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

18 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

19 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

20 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

20 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

21 hours ago