मुंबई

आलेली केस प्रलंबीत ठेऊ नका, जनतेला न्याय मिळेल असे पहा : मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला

मुंबईतील माजगाव कोर्टाच्या नवीन इमारतीचे रविवारी (दि.२२) रोजी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला म्हणाले, इमारतीकडे पाहिल्यावर ही सरकारी इमारत आहे असे वाटतच नाही. इतक्या चांगल्या रीतीने ही इमारत तयार झालेली आहे. या नवीन इमारतीमध्ये न्यायाधीशांनी आपल्याला समोर आलेली पहिली केस प्रलंबित ठेवू नये. जनतेला त्वरित न्याय मिळेल असे पहा, असे आवाहन केले.

यावेळी एस. व्ही. गंगापूरवाला पुढे म्हणाले, इमारत समितीने चांगले काम केले आहे, न्यायमूर्ती रेवती ढेरे यांचे यासाठी विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे काम गतीने झाले. न्यायदानापर्यंत पोहचणे महत्वाचे असते, त्यासाठी योग्य अशा सुविधाही महत्वाच्या ठरतात. ते उपलब्ध असेल तर न्यायदान जलद होते. ई- फायलिंगची सुविधा इथे असेल, याचा व्याप इथे वाढवला जाईल. अनेक खटले प्रलंबित आहेत, मात्र त्यांचा निपटारा जरुरी आहे. सगळेचजण या इमारतीत काम करण्यास उत्सूक आहे.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली माजगाव न्यायालयाची इमारत अखेर सज्ज झाली आहे. रविवारी (दि.22) रोजी उद्घाटन होऊन लोकार्पण देखील केले गेले आणि तब्बल 21 दंडाधिकारी न्यायालय या एका इमारतीत चालतील. त्यामुळे न्यायदान जलद गतीने होईल अशी आशा देखील इतर उपस्थित न्यायाधीशांनी व्यक्त केली. एकूण 42 न्यायालये येथे होतील अशा रीतीने या नव्या इमारतीचे बांधकाम केलं आहे.

प्रत्येक खटला दाखल करताना त्याचे ई-फायलिंग केले जाईल आधुनिक प्रणालीचा वापर त्यात होईल. परिणामी कागदपत्र वेळ आणि श्रम याची बचत होईल. मनुष्यबळ त्याचा उपयोग अधिक सक्षमपणे होईल. संगणकाचा अधिकाधिक वापर केला जाईल. मुंबईची काही न्यायालये नवीन माजगाव इमारतीत हलवण्यास विरोध देखील झाला आहे.

हे सुद्धा वाचा

घरकाम करणाऱ्या महिलेनं भाडेकरूंना 3 कोटी रुपयांना फसवलं. 

आखाजी गाणी : खान्देशातील अक्षय्य तृतीया खास करणारी अहिराणी गीते 

आखाजी : खान्देशातील आगळीवेगळी अक्षय्य तृतीया परंपरा

माझगाव न्यायालयामध्ये मुंबईच्या सत्र न्यायालयातील काही न्यायालय बाबत विरोध देखील झाला होता. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या जवळ असलेली कोर्ट विभागातील सत्र न्यायालयाची इमारत आहे. त्या ठिकाणी अनेक दंडाधिकारी न्यायालय आणि विशेष न्यायालय सुरू आहेत. नवीन माजगावच्या न्यायालयात या सत्र न्यायालयामध्ये काही न्यायालये हलवली जाणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात सत्र न्यायालयाच्या ठिकाणाहून नवीन माजगाव न्यायालयात न्यायालये हलवण्यास बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट बार असोसिएशनने विरोध देखील केला आहे.

Inauguration of new building of Majgaon Court in Mumbai

सुधाकर काश्यप

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 hour ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

3 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

24 hours ago