मुंबई

फास्टॅग सवलतीस मोठा प्रतिसाद

टीम लय भारी

मुंबई  : राजीव गांधी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटारगाडी, जीप व एसयूव्ही वाहनांना फास्टॅग (Fastag) वापरावर दिल्या जाणाऱ्या सवलतीस मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सात दिवसांत तीन लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांना पाच टक्के सवलतीपोटी १९ लाख आठ हजार ५९७ रुपये परतावा देण्यात आला.

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महामार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने अधिकाअधिक वाहनचालकांनी फास्टॅग वापरण्यास सुरुवात करावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मर्यादित कालावधीसाठी या दोन मार्गावर ११ जानेवारीपासून प्रत्येक फे रीमागे पथकराच्या पाच टक्के सवलत देण्याची योजना जाहीर केली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरील पथकर नाक्यांवर ही सवलत देण्यात येत आहे.

यामध्ये ११ ते १७ जानेवारी या सात दिवसात एकूण तीन लाख ४५ हजार १५५ वाहनांनी या सवलतीचा लाभ घेतला. सवलत रक्कमेच्या परताव्यापोटी एमएसआरडीसीने १९ लाख आठ हजार ५९७ रुपये वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केले.

पथकर नाक्यांवर १०० टक्के फास्टॅग अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने अद्यावत करण्याचे काम २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील, तर २६ जानेवारी २०२१ पासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक वाहनधारकांनी त्याचा फायदा घ्यावा.

अभिषेक सावंत

Recent Posts

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

28 seconds ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

21 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

21 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

22 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

22 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

22 hours ago