Categories: मुंबई

कोरोनापुढे हतबल मुंबई महापालिकेचे मुंबईकरांना साकडे

मुंबईत कधीही निर्बंध लागू होण्याची शक्यता

 

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीचा (Coronavirus) वेग वाढू लागला आहे. त्यासोबतच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि शहराची आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेने थेट मुंबईकरांनाच साकडे घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे हे मुंबईकरांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही, असे पालिकेने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे. यासाठी गेल्या तीन महिन्यांची म्हणजेच यावर्षी जानेवारीपासूनची मुंबईतल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देखील ‘या’ ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

‘या’ ट्वीटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये फक्त आकडे वाढताना दिसत आहेत. मात्र, वर दिलेल्या आकडेवारीमध्ये पालिकेने मुंबईकरांसाठी एक महत्वाचा संदेश दिला आहे. “२०२१ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत फक्त २३९ नव्या रुग्णांची भर पडली. पण पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे रुग्ण वाढले तर आता ११ मार्चला तब्बल १५०८ नवे कोरोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. हा आलेख कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवणं आपल्या हातात आहे. या व्हायरसला मुंबईवर मात करू देऊ नका. मुंबई, तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही”, अशा आशयाचा संदेश ‘या’ ट्वीटमध्ये दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १२ मार्च या एका दिवशी १६४६ नव्या बाधितांची भर पडली आहे. मुंबईत आजघडीला एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. एकीकडे ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण या मुंबईच्या आजूबाजूच्या महानगरपालिकांनी शहरात कोरोनाबाबतचे निर्बंध घातले असताना आता मुंबईत देखील असेच निर्बंध घालण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कधीही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांत सर्वाधिक रुग्ण

 

मुंबईत कोरोनाने शिरकाव केला तेव्हापासून पश्चिम उपनगरात सर्वाधिक संसर्ग आढळला. आता कोरोना संख्येस उतार येत असतानाच, नव्याने कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण बोरिवलीत ८१६, कांदिवली ७००, मालाड ६८८, अंधेरीतील पूर्व ६७८ आणि पश्चिमेस ७८३ आढळले आहेत.

पश्चिम उपनगराच्या तुलनेत मध्य आणि पूर्व उपनगरातील संख्या कमी आहे. पण १० विभागात रुग्ण संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. पूर्व उपगरातील मुलुंड, घाटकोपर, भांडुपमध्येही अनुक्रमे ६११, ५७५ आणि ५७१ इतके उपचाराधीन रुग्ण आहेत. नेहमीच विशेष लक्ष द्यावे लागणा-या दादर, धारावीत ५३४ आणि ग्रँट रोडमध्ये ५२६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

त्यामुळे पालिका अधिक प्रमाणात सतर्क झाली असून, नियमांचे कठोर पालन करण्यावर भर दिला जात आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

4 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

5 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

6 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

6 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

6 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

9 hours ago