Coronavirus : कोरोनाचा विळखा! मंत्रालय हादरले!

टीम लय भारी

मुंबई : मुंबई कोरोनाचे (Coronavirus) हॉटस्पॉट झाले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. मात्र, आता आयएएस-आयपीएस अधिकारी रहात असलेल्या यशोधन इमारतीमधील एका महिला आयएएस अधिकारी आणि तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

या आधी मंत्रालयातील दोन प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना (Coronavirus) बाधित झाले होते. आता मंत्रालयातील कोरोना बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे.

मुंबईतील मंत्रालयाजवळील यशोधन या इमारतीत शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिका-यांचे निवासस्थान आहे. यामधील एका आयएएस महिला अधिका-याला कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे आयपीएस असलेल्या तिच्या पतीलाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मात्र त्यामुळे ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली नसून इमारतीचा केवळ चौथा मजलाच संपूर्णपणे सील करण्यात आल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. तसेच या इमारतीतून कुणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत मंत्रालयातील 2 प्रधान सचिव, 1 उपसचिव, 2 सफाई कर्मचारी, एक PWD विभागातील कंत्राटी कामगार आणि मंत्रालयात उभ्या असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

पोलिस खात्यामध्ये 1388 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात, 12 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 1388 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात 948 जणांवर उपचार सुरू असून 428 पोलिसांनी या आजारावर मात देखील केली आहे.

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीपासून क्वारंटीन सेंटर ते नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात आता पोलिस कर्मचारी देखील आले आहे.

मागील दीड ते 2 महिन्यांमधील पोलिसांवरील ताण लक्षात घेता काल मुंबईतील पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मंत्रालयातील 1400 कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी लावण्यात आली आहे.

तसेच आता केंद्राचे सुरक्षा दलाचे जवान महाराष्ट्रात काम करण्यास सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद अशा कोरोना हॉटस्पॉट अधिक असलेल्या ठिकाणी केंद्राचे जवानांच्या 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान भारतासह महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लाक्षणिक वाढ बघायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 37 हजाराच्या पार गेला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रूग्ण पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता मुंबई पालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यांच्यावरील ताणदेखील वाढला आहे.

हे सुद्धा वाचा…

रोहित पवारांची बॅटींग भक्तांना लागली जिव्हारी

 

अरेरे : गुजरातवरून आलेला मृतदेह कर्नाटकने नाकारला, महाराष्ट्राने अंत्यसंस्कार केले

अभिषेक सावंत

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

13 hours ago