मुंबई

‘या’ लोकांना विचारपूर्वक दिली पाहिजे ‘कोरोना’ व्हॅक्सीन

टीम लय भारी

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची प्रकरणे आता कमी होऊ लागली आहेत. तर दुसरीकडे अनेक देशात लोकांना कोरोना व्हॅक्सीन (Coronavirus Vaccine) देण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. फायजर-बायोएनटेक, मॉडर्ना, ऑक्सफोर्ड-अस्ट्राजेनेका सारखी व्हॅक्सीन ट्रायलमध्ये यशस्वी ठरली आहे आणि तिचे खुप कमी साइड इफेक्ट्स आढळले आहेत. तर भारतात सुद्धा कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये चांगले परिणाम आल्यानंतर इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या सर्वच व्हॅक्सीन मोठ्या लोकसंख्येसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत, परंतु तरी सुद्धा काही लोकांना विचारपूर्वक व्हॅक्सीन देण्याचा सल्ला दिला जात आहे. कोणत्या गटाच्या लोकांना कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन देण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे, ते जाणून घेवूयात…

अ‍ॅलर्जीची समस्या असणारे लोक

अमेरिकेच्या सीडीसीनुसार, फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सीनची अनेक लोकांना गंभीर अ‍ॅलर्जी आढळून आली आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीन घेतल्यानंतर छोट्या-छोट्या समस्या ही सामान्य बाब आहे. परंतु अ‍ॅनाफिलेक्सिस सारखी अ‍ॅलर्जी घातक ठरू शकते. सीडीसीचा सल्ला आहे की, व्हॅक्सीनमध्ये वापरलेल्या कोणत्याही इनग्रेडिएंटची जर कुणाला अ‍ॅलर्जी असेल तर त्यांना ही व्हॅक्सीन देऊ नये. अशावेळी डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. व्हॅक्सीन घेतल्यानंतर 30 मिनिटे देखरेखीखाली ठेवले पाहिजे.

प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फीडिंग करणार्‍या महिला

गरोदर किंवा फीड करणार्‍या महिलांना कोरोनाची व्हॅक्सीन देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. कारण क्लिनिकल ट्रायल गरोदर महिलांवर करण्यात आलेली नाही. यासाठी अशा लोकांना व्हॅक्सीन एक चिंतेची बाब होऊ शकते. परंतु, अमेरिकेच्या काही हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, जरी याबाबतच डेटा नसला तरी गरोदर महिलांना कोरोनाचा जास्त धोका असतो, म्हणून व्हॅक्सीन घेतली पाहिजे.

कोरोना पॉझिटिव्ह लोकांना

क्लिनिकल ट्रायलमध्ये सर्व व्हॅक्सीन त्या लोकांवर सुरक्षित आढळली आहे ज्यांना अगोदर कोरोना कोरोना संसर्ग झाला होता. सीडीसीचे म्हणणे आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीला व्हॅक्सीन तोपर्यंत देऊ नये जोपर्यंत ती आयसोलेशन आणि या महामारीतून पूर्णपणे बाहेर येत नाही. तर अँटीबॉडी थेरेपी घेणार्‍यांना 3 महिन्यानंतर व्हॅक्सीन दिली पाहिजे.

मेडिकल कंडीशनवाले लोक

क्लिनिकल ट्रायलनुसार, व्हॅक्सीन मेडिकल कंडीशनवाल्या लोकांवर तसाच परिणाम करते जेवढा निरोगी लोकांवर. कॅलिफोर्निया विद्यापीठात संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉक्टर डीन ब्लमबर्गने हेल्थलाइनला सांगितले, आमच्याकडे इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड किंवा एचआयव्ही रूग्णांचा डेटा नाही. परंतु आम्हाला माहिती आहे की, या लोकांमध्ये कोरोनाचा धोका गंभीर होऊ शकतो. यासाठी हे लोक सुद्धा व्हॅक्सीन घेऊ शकतात. मात्र, हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे आणि ती घेण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.

लहान मुले

मॉडर्ना व्हॅक्सीन 18 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. तर फायजर व्हॅक्सीन 16 वय आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. तर, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन 12 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वर्गाला दिली जाऊ शकते. तर कोविशील्डचा वापर 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये केला जाऊ शकतो. सध्या मुलांमध्ये कोरोना व्हॅक्सीनचा स्टडी करण्यात आलेला नाही, यासाठी व्हॅक्सीन देणे ऑथराइज्ड करण्यात आलेले नाही.

या लोकांना अगोदर दिली जाईल व्हॅक्सीन

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरू होणार आहे. या व्हॅक्सीनेशन ड्राइव्हमध्ये सर्वप्रथम डॉक्टर, हेल्थकेयर वर्कर्स, सफाई कर्मचार्‍यांसह सर्व फ्रंटलाइन वर्कर्सला प्राथमिकता दिली जाईल. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि गंभीर आजारी असलेल्या लोकांना व्हॅक्सीन देण्याचे काम केले जाईल.

अभिषेक सावंत

Recent Posts

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासने

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धकाधकीची झाली आहे. त्यामुळे आजार देखील खूप कमी वयात होत आहे.…

1 hour ago

Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat…

2 hours ago

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

4 hours ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

5 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

5 hours ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

5 hours ago