मुंबई

Covid deaths in Mumbai : ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या हवालदाराबद्दल माजी वरिष्ठांनी व्यक्त केलेल्या भावना

ॲड. विश्वास काश्यप

बांद्रा पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार हाटे ( Police’s covid deaths in Mumbai ) ह्यांचा आज ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्याचे आताच फेसबुक वरून समजले. एक जबरदस्त धक्का बसला. झटझट हाटे डोळ्यासमोर येऊ लागला. एक प्रेमळ, प्रामाणिक, कष्टाळू, हसतमुख हाटे…

मी त्यावेळी मलबार हिल पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक ह्या पदावर कार्यरत होतो ( Malbar police station in Mumbai ). इक्बाल शेख साहेब सिनियर पी. आय. होते. त्यानंतर शैलेंद्र गायकवाड साहेब आले. त्या दोघांचा हाटे हा ऑडरली होता.

आमच्या पोलीस खात्यात ऑडरली ह्या पदाला एक महत्वपूर्ण स्थान आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती म्हणजे पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची कुंडली जवळ बाळगून असलेला एक खासम खास माणूस.

सगळ्या पोलीस स्टेशनची इत्यंभूत माहिती असणारा, सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ज्याचा जास्तीत जास्त संबंध येतो तो ऑडरली. एकवेळ त्या सिनियरला पोलीस स्टेशनला काय चाललंय ह्याची माहिती नसते परंतु ऑडरलीला सर्व माहिती असते.

हे सुद्धा वाचा

Lockdown : माजी अधिकाऱ्याचे पोलीस बांधवांना पत्र

Police : ‘पोलिसांचे पगार 6 महिन्यांसाठी दुप्पट करा’

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारीजी, राजीनामा देऊन तुम्ही गावी परत जा

Solapur covid-19 deaths : मुख्य सचिवांनी सोलापूर जिल्हाधिकारी, आयुक्तांची खरडपट्टी काढली, सोलापूरमध्ये ‘कोरोना’चा देशातील सर्वाधिक मृत्यूदर

सिनियरचे जणू कान, डोळे, सर्व काही. पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफ बंदोबस्तासाठी बाहेर जातील. हा मात्र पोलीस स्टेशनलाच असेल. कोणता साहेब कुठे गेला आहे ? ते काय करीत आहेत ? कोणाचे आर्थिक गणितं कसे जुळत आहेत ह्याची खडानखडा माहिती तो आपल्या सिनियरला विश्वासूपणे देत असतो.

सिनियर जेव्हा पेट्रोलिंगसाठी बाहेर असतात, तेव्हा ते ह्या ऑडरली मार्फतच सर्व आदेश पारित करीत असतात. ह्या अधिकाऱ्याला इकडे पाठव, तिकडे पाठव. इन्चार्ज हवालदाराला सांगून योग्य ते मनुष्यबळ कोठे पाठवायचे ह्या संबंधित सर्व आदेश ऑडरली मार्फत सर्व पोलीस स्टेशनला मिळत असतात.

ऑडरली म्हणजे त्या पोलीस स्टेशनचा कणाच म्हणा ना ( Orderly is key person in each police station ) . तो कणा जितका चांगला तितके त्या पोलीस स्टेशनचे अंतर्गत  वातावरण चांगले. इतके महत्व त्या पदाला आहे.

ऑडरलीचा रुबाब हा काही औरच असतो. सिनियर साहेबांचा मूड कसा आहे हे जाणून घेण्यापासून पोलीस स्टेशनच्या कोणत्याही एका ‘चांगल्या’ बीटमध्ये वर्णी लावून घेण्यासाठी सुद्धा ऑडरलीचा महत्वपूर्ण सहभाग असतो. पोलीस खात्यातील कित्येक अधिकाऱ्यांचे आयुष्य हे त्या ऑडरलीच्या चांगल्या किंवा वाईट असल्यामुळे घडले किंवा बिघडले आहे.

सिनियरचे युनिफॉर्म व्यवस्थित लावण्यापासून सिनियरच्या सगळ्या महत्वपूर्ण योजनांचा कर्ता करविता. इतका हा ऑडरली महत्वाचा घटक आहे.

तर असा हा ऑडरलीच्या भूमिकेत असलेला आमचा हाटे. अतिशय प्रेमळ, सतत हसतमुख. कोकणातील असल्यामुळे कष्टाळू, प्रामाणिक थोडासा भोळसर. शेख सरांचा आणि गायकवाड सरांचा अतिशय विश्वासू. त्या दोघांचेही फार प्रेम मिळाले हाटेला.

हाटे आम्हा अधिकाऱ्यांना भरपूर मदत करायचा. पोलीस खात्यात एखाद्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर त्या गुन्ह्याचा ज्या  दिवशी तपास केला त्याचा संपूर्ण लेखी रिपोर्ट वरिष्ठांना त्याच दिवशी सादर करावा लागतो. त्याला पोलिसांच्या भाषेत केस डायरी म्हणतात.

कामाच्या व्यस्ततेमुळे ती केस डायरी दररोज लिहिणे शक्य होत नाही. मग अधिकारी २/४ दिवसांच्या केस डायऱ्या एकत्र लिहून त्या वरिष्ठांच्या सहीसाठी ठेवतात. त्या केस डायरी वर सह्या घेण्याचे काम ऑडरली करीत असतो. त्यावर वरिष्ठांची सही झाली म्हणजे त्या केसच्या संदर्भात अर्धी लढाई जिंकल्यासारखी असते. एखादा खडूस सिनियर त्यावर सहीच करीत नाही. मग त्या अधिकाऱ्याला अडचण निर्माण होते.

हाटे मात्र आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या केस पेपर वर सिनियरच्या सह्या अतिशय हुशारीने घ्यायचा. वेळप्रसंगी तो वरिष्ठांच्या शिव्या सुद्धा  खायचा. वरिष्ठ पोलीस स्टेशन मधून निघून गेल्यानंतर हाटे ते केस पेपर घेऊन आम्हा अधिकाऱ्यांकडे यायचा. साहेब, तुमच्यामुळे आज मी साहेबांच्या शिव्या खाल्या  पण मी साहेबांना मस्त पटवले हे तो हसत हसत सांगायचा. आम्ही थॅंक्यु थॅंक्यु म्हणून त्याला चहा पाजायला घेऊन जायचो.

हाटे कधीही पहा सतत हसतमुख. त्याच्या कपाळावर आम्ही कधीही ‘आठ्या’ पहिल्या नाही. सगळ्यांच्या मदतीला पुढे. सिनियर आणि आमच्या मधील तो एक खरोखरच चांगला दुवा होता.

मी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर बांद्रा पोलीस स्टेशनला ३/४ वेळा त्याला खास भेटायला गेलो होतो. तेव्हाही तोच प्रेमळ आणि उत्साही हाटे. शेवटच्या भेटीत त्याने मला सांगितले की, त्याच्या कोकणातील घरी जागेबाबत काहीतरी वाद चालू आहेत आणि गरज पडल्यास तो मला फोन करेल. मी हाटेला सांगितले कधीही फोन कर. तो हाटेचा चेहरा आज माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही.

हाटेच्या निमित्ताने मी माझ्या पोलीस बांधवांना पुन्हा एकदा नम्र आणि कळकळीची विनंती करतो. ह्यापूर्वी सुद्धा कोरोनाच्या सुरवातीला मी आपल्याला खुले पत्र लिहून आपण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असे ( Police should take care in Corona Pandemic ) सुचविले होते. पोलीस खात्यात पोलीस शिपाई ते सिनियर पी. आय .इतक्याच जणांचा डायरेक्ट लोकांशी संबंध येतो. बाकी सगळे वरीष्ठ ए.सी. गाडीत बसून, सुरक्षित फिरून लेखी आदेश काढण्याशिवाय काहीही करीत नाहीत.

पोलीस बंधू भगिनींनो, आपण गरीब घरातुन आलोय ( Police should keep in mind their family background ). आपली काय ५० एकर बागायती शेती नाही. इतकी शेती असणारा मुळातच पोलिसात भरती कशाला होईल ? बांधवांनो, आपल्यानंतर आपले कुटुंब उघड्यावर पडेल. कोणीही मदतीला येणार नाही. आपल्या घरच्यांना आपल्या इतपत बाहेरच्या जगाचे ज्ञान नसते. आपला नवरा मेल्यानंतर सरकारी लेखी प्रोसिजर काय आहे हे सुद्धा त्या माउलीला माहीत नसते.

तेव्हा माझ्या बांधवांनो, भगिनींनो सावधान. आपले आयुष्य आपल्या घरासाठी अनमोल आहे ( Police life is precious for their family members ) . त्याला इतक्या सहजपणे वाया घालवू नका. आपले काम अतिशय सुरक्षितपणे करा. उगाचच फुकटचे धाडस आणि हौतात्म्य पत्करू नका ( Covid deaths in Mumbai in not good for police’s family ) .

आता हाटेचेच पहा ना. २/३ दिवस त्याची आपण आठवण काढू आणि गप्प बसू. त्यानंतर त्याच्या कुटुंबाचे काय झाले ? त्याची पत्नी, लहान मुले कशा अवस्थेत जगत आहेत ? ह्याचे कोणालाही काहीही वाटणार नाही ( Covid deaths in Bandra Police station ).

हाटे मित्रा, आम्हाला माफ कर. आम्ही दुसऱ्यांचे प्राण वाचवतोय परंतु आम्ही तुला नाही वाचवू शकलो ( Police constable Mr. Hate died due to Covid)

हाटे, तू मात्र आमच्या सर्वांच्याच कायम मनात राहशील. आठवणीत राहशील. तुझ्याबरोबर ज्या ज्या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने काम केले आहे ते तुला कधीही विसरणार नाहीत. ते तुला कायम त्यांच्या कुटुंबातीलच समजतील.

हाटे, काय राव इतक्या लवकर ट्रान्सफर घेऊन जाशील असे कधी वाटलेच नव्हते.

हाटे, सांभाळ स्वतःला. काळजी घे. आम्हाला खात्री आहे तू जिथे असशील तिथे तू सतत हसत राहून सर्वांची काळजी घेत असशील. त्यांना मदत करीत असशील.

हाटे यार, तू नेहमी आमच्या सोबत राहणार आहेस. मी ह्यापुढे जेव्हा जेव्हा ऑडरलीला पाहीन, तेव्हा तेव्हा त्यामध्ये मी तुलाच शोधेल. नक्की मित्रा.

( लेखक माजी पोलीस अधिकारी आहेत, व सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात )

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago