मुंबई

फेसबुकवर ठरलं, कुबेर ग्रुपने केली दोन लाखांची मदत

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होते आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होते आहे. या परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. फेसबुकवरील एका कुबेर नावाच्या समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली (A group called Kuber on Facebook donated Rs 2 lakh to the CM Assistance Fund).

साधारण पणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक संतोष जगन्नाथ लहामागे यांनी फेसबुकवर (Facebook) कुबेर नावाच्या एका समुहाची स्थापना केली. शिक्षण, कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समुह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.

महाराष्ट्राचे दिल्लीश्वरांकडून कौतुक, पंतप्रधानांच्या तोंडून ठाकरेंचे गुणगाण

राजेश टोपेंनी लॉकडाऊनवाढीचे दिले संकेत

कोरोनाचा वाढता कहर पाहता या समुहाने महाराष्ट्रातील करोनाग्रस्त जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन लाख रुपयांचा निधी द्यावा असा ठराव फौंडेशनचे अध्यक्ष संतोष लहामगे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्याध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव मिनल गिरडकर, खजिनदार नन्दू सावंत, प्रवक्ते प्रशांत दौडकर, कुबेर फौंडेशनचे सर्व संचालक मंडळ तसेच फौंडेशनचे सदस्य डॉ. अभिजित कदम, ऍड. लीना प्रधान गुरव, जतीन तिवारी, शैलेश कलंत्री, अमेय सोनावणे, नितीन नरखडे, प्रशांत दाते यांच्या संमती प्रारीत करण्यात आला.

Coronavirus: SC forms 12-member team to streamline oxygen allocation, ensure availability of drugs

काल ७ मे २०२१ रोजी सदर धनादेश आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कडे सुपूर्द केला. यावेळी कुबेर फौंडेशनचे सन्माननीय सदस्य ऍड. प्रशांत गुंजाळ, सचिन गणोरे, शोहरब पठाण, अमोल बस्ते, प्रथमेश बेल्हेकर, गौरव डोंगरे इत्यादी उपस्थित होते.

याच समाजभावनेमधून पूर्वी या समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील ओढ्याचे रुंदीकरण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, शाहदा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान, विविध अनाथ आश्रमातील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप, प्रकाश आमटे, कोल्हे या दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम या पूर्वीही कुबेर नावाच्या समुहाने केलेले आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago