मुंबई

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटीव्ह, उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल

टीम लय भारी

मुंबई : भाजपा नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. (Devendra Fadnavis is corona positive, admitted to St. George’s Hospital for treatment) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.

फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौ-यावर गेले होते. मात्र, गेल्या ४ दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी!, असे ट्विट फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांना नेमकी कोठून कोरोनाची लागण झाली, याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घेत, कोरोना चाचणी करावी, असे आवाहन खुद्द फडणवीस यांनी केले आहे.

सेंट जॉर्जमध्ये उपचारासाठी दाखल

फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ताप असल्याने डॉक्टरांनी फडणवीसांवर उपचार सुरु केले आहेत. फडणवीसांनी आपला मित्र आणि भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांना काही महिन्यांपूर्वी ‘मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा’ अशी विनंती केली होती. त्यानुसार सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयातच त्यांना दाखल करण्यात आले आहे.

महाजन-फडणवीसांमध्ये संभाषण

‘नेते मंडळी, मंत्रिमंडळातील सदस्य, धनदांडगे मंडळी आहेत, ते ब्रिच कँडीमध्ये दाखल होतात. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे ते अ‍ॅडमिट होऊ शकतात, पण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. फडणवीसांनाही तेच वाटत होते. पण कोरोना होऊ नये, होणार नाही; पण कोरोनाची लागण झाली, तर मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, सेंट जॉर्जमध्येच दाखल करायचे’ असे फडणवीस यांनी सांगितल्याचे गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

1 week ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

1 week ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 week ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago