मुंबई

ड्रग्स केस : राष्ट्रवादीचे दिग्गज आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCB कडून ‘समन्स’

टीम लय भारी

मुंबई : मुंबईमध्ये 200 किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. समीर खान यांचं लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झालं आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान आणि करन सजनानी यांच्यामध्ये 20 हजार रूपयांची घेवाण-देवाण झाली होती.

करन सजनानी आणि समीर खान यांच्यामध्ये गुगल पे व्दारे 20 हजार रूपयांचा व्यवहार झाला आहे. ड्रग्स संदर्भातच पैशांची घेवाण-देवाण झाल्याचा संशय एनसीबीला आहे. त्याचीच पडताणी करण्यासाठी एनसीबीनं समीर खान यांना बोलावलं आहे. ड्रग्स केस प्रकरणात एनसीबीच्या रडारवर अनेक जण आहेत. मंगळवारी एनसीबीनं मुंबईमध्ये मुच्छड पानवाला राजकुमार तिवारी याला अटक केली होती. सोमवारी एनसीबीनं मुच्छड पानवालाचे मालक जयशंकर तिवारी आणि राजकुमार तिवारी यांच्याकडे काही तास सखोल चौकशी केली होती.

राजकुमार तिवारी, जयशंकर तिवारीचा लहान भाऊ आहे. राजकुमार तिवारी आणि जयशंकर तिवारी हे दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या कॅम्प कॉर्नर येथे पान शॉप चालवतात. जयशंकर तिवारी आणि राजकुमार तिवारी हे 6-6 महिने पान शॉप चालवतात. त्याच्याच पान शॉपवर बॉलिवूड आणि कार्पोरेट जगतातील मोठया हस्ती पान खाण्यासाठी येत असतात.

अभिषेक सावंत

Recent Posts

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

2 hours ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

3 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

3 hours ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

3 hours ago

निरोगी राहण्यासाठी नक्की खा हे सुपरफूड, जाणून घ्या

अन्न हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अन्नामध्ये विशिष्ट प्रकारचे पोषक घटक आढळतात,…

4 hours ago

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 days ago