Categories: मुंबई

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान नेता व आपण एक स्नेही गमावला आहे अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala)  यांनी व्यक्त केल्या आहेत.प्रतापराव भोसले (Prataprao Bhosale) यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करून चेन्नीथला म्हणाल की, प्रतापराव भोसले यांनी तरुण वयात काँग्रेस पक्षाचा विचार अंगीकारला तो त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला.(Former Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) president Prataprao Bhosale paid tribute to in-charge Ramesh Chennithala)

गावच्या सरपंच पदापासून आमदार, खासदार, मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. लोकसभेत खासदार म्हणून आम्ही एकत्र काम केले त्यावेळी त्यांच्याशी माझा जवळून संबंध आला. त्यांच्या अभ्यासू व मनमिळावू स्वभावामुळे पुढे आमचा स्नेह वृद्धिंगत झाला. त्यांनी कायम सातारची जनता व साता-याच्या विकासासाठी कार्य केले. त्यांनी कधीही आपल्या तत्वांशी आणि पक्षनिष्ठेशी तडजोड केली नाही. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून संपूर्ण काँग्रेस पक्ष भोसले कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे चेन्नीथला म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago