मुंबई

Kangana Ranaut : ‘कंगना रणौत-हृतिक रोशन’ची केस पोहोचली क्राईम ब्रांचकडे ! अभिनेत्रीनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

टिम लय भारी

मुंबई : बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत आजही चर्चा आहे. अशातच आता हृतिक रोशनची 4 वर्षे जुनी केस क्राईम ब्रांच इंटेलिजेंस युनिट (CIU) कडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. कंगना आणि हृतिकशी संबंधित या प्रकरणाचा तपास आधी सायबर पोलीस करत होते. आता ही केस सीआययुकडे आहे. 2016 या पासून या प्रकरणी काही प्रगती न झाल्यानं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांच्या कार्यालयानं अलीकडेच 9 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं. यावर आता कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनानं साधला हृतिकवर निशाणा

कंगनानं ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं हृतिकवर निशाणा साधला आहे. कंगनानं लिहिलं की, त्याची रडगाण्यावाली कहाणी पुन्हा सुरू झाली आहे. आमचं ब्रेकअप आणि त्याच्या घटस्फोटाला खूप वर्षे झाली आहेत. परंतु तो पुढं जाण्यासाठी तयार नाहीये. एखाद्या महिलेला डेट करण्यासाठी तयार नाहीये. मीही माझ्या खासगी आयुष्यात काही अपेक्षा केल्या होत्या आणि पुन्हा त्याचा हा ड्रामा सुरू झाला. हृतिक रोशन, एका छोट्या अफेअरसाठी किती दिवस रडणार ?

नेमकं प्रकरण काय ?

2016 मध्ये हृतिक रोशननं अॅक्ट्रेस कंगनाच्या अकाऊंटवर जवळपास 100 पेक्षा जास्त ईमेल मिळाल्यावरून केस दाखल केली होती. सोबत त्यानं कंगनासोबत कोणतंही अफेअर असल्याचं नाकारलं होतं. आता सीआययुनं या केसचा तपास सुरू केला आहे. हृतिकनं 2016 मध्ये सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 419 आणि आयटी अॅक्टमधील कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल केली होती. पोलिसांनी फेक ईमेल प्रकरणी कंगना आणि तिच्या बहिणीचा जबाब घेतला होता. यानंतर दोघांमध्ये कायदेशीर आणि सोशल वॉर सुरू झालं. दोघं एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago