Categories: मुंबई

काल मंत्रीपदे गेली; आज कार्यालये, गाड्या, बंगल्यांवरही गंडांतर

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यपालांनी काल राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसहीत सगळ्या मंत्र्यांची पदे आपोआपाच संपुष्टात आली आहेत. ‘काळजीवाहू’पद सुद्धा उरलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्याच मंत्र्यांची कार्यालये, गाड्या, बंगले, सरकारी साहित्य, कर्मचारी वर्ग इत्यादी सेवा संपुष्टात येणार आहेत.

राज्याच्या जुन्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला होता. त्याच वेळी सर्व मंत्री कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना सोडून देण्याचे आदेश सामान्य प्रशासन खात्याने जारी केले होते. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे फडणवीस यांच्यासहीत सर्व मंत्र्यांची कार्यालये, गाड्या या सुविधा शाबूत होत्या. पण काल राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे या सगळ्या सुविधा आजपासून रद्दबात होतील.

‘लय भारी’ न्यूज पोर्टलवरील बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

सामान्य प्रशासन विभागाकडून आज प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयातील सर्व साहित्यांची यादी तयार केली जाईल. यामध्ये बंगले, गाड्या, संगणक, फर्निचर, प्रिंटर अशा सगळ्या साहित्यांचा समावेश असेल. हे साहित्य पाच वर्षांपूर्वी मंत्र्यांच्या कार्यालयांना दिले होते, तेव्हाच त्यांची यादीही तयार करून ठेवलेली होती. त्या यादीनुसार सगळे साहित्य जमा करण्याचे आदेश सामान्य प्रशासन खात्याकडून आज प्रत्येक मंत्री कार्यालयाला पाठवले जातील. मंत्र्यांच्या नावांच्या पाट्याही तातडीने काढून घेतल्या जातील.

मुख्यमंत्री असो किंवा मंत्री यांना आजपासून जुन्या पदाचे कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. मंत्रालयातील आपल्या दालनात त्यांना ‘आवराआवरी’च्या कामाव्यतिरिक्त जाताही येणार नाही.

बंगले खाली करा, नाहीतर पैसै भरा

मुख्यमंत्री, मंत्री व त्यांच्या अधिकाऱ्यांना बंगले, खोल्या रिकामे करण्याचे आदेश आज जारी होतील. पण काही कारणास्तव मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी बंगले रिकामे केले नाहीत, तर त्यांना प्रती चौरस फुटानुसार दर दिवसाचे भाडे मोजावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

अलिशान अधिकार क्षणभंगूर

मंत्री, त्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय्य सहाय्यक यांच्यासाठी पाच वर्षे म्हणजे सुखावह असतात. सरकारमध्ये मोठ्या पदावर असल्याचा त्यांना फायदा होतो. अधिकार गाजवता येतात. मान – सन्मान मिळतो. सरकारी खर्चाने राहणे, फिरणे, खाणे अशी मौज करता येते. पण मंत्रीपदे जाताच मंत्र्यासहित सगळ्यांचेच पाय जमिनीवर येतात. गाडी, बंगले, साहित्य सगळेच काढून घेतले जाते. त्यामुळे मंत्रीपदाच्या कालावधीत भोगलेले सगळे आलिशान आयुष्य क्षणभंगूर आहे, असे एका मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याने ‘लय भारी न्यूज नेटवर्क’शी बोलाताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रपती राजवटीमुळे जनतेवर कोणता फरक पडेल ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

उद्धव ठाकरे – अहमद पटेल यांच्यात चर्चा, राष्ट्रवादीचीही आज बैठक

शिवसेनेचा पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात’

तुषार खरात

View Comments

  • राजकारणं अती हीन पातलिवर नेले जात आहे.

    जनतेने 105 आमदार निवडून दिले...ते मोठे की 56 दिले ते मोठे ?
    बरोबरी मागायला मनाची तरी वाटली पाहिजे .

    काल शिव्या दिल्या , आज त्यान्चीपायधरणी ?

    त्यापेक्षा.....आपली जनमण्डपी ..' औकात ' ओळखून काम केलं असतं तर...?

Recent Posts

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

8 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

39 mins ago

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

2 hours ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

3 hours ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

16 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

17 hours ago