Categories: मुंबई

मुसळधार पाऊस कोसळू लागल्यावरही धरणांचे घसे कोरडे; मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात

शनिवारपासून राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असताना जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना धरणांचा तालुका असणाऱ्या शहापूरमधील धरणात अवघे काही दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धरणे भरल्यानंतर पाणी कपात रद्द होऊ शकते. यावर्षी राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे मुंबई महानगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने येत्या 1 जुलैपासून मुंबईमध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या या धरणातून ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो त्यामध्ये सुद्धा 10 टक्के कपात करण्यात येणार आहे. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अशीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत मुंबई महानगपालिका क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक 1 जुलै 2023 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अपुऱ्या पाणीसाठयामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहेत.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, विहार व तुळशी या धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा या धरणांमधून होतो. यंदा पावसाळा सुरू होऊनदेखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दहलक्ष लिटर इतका असावा लागतो. आत्ताच्या स्थितीला जलाशयांमध्ये एकूण 99 हजार 164 दशलक्ष लिटर म्हणजे 6.85 टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जलाशयांतील पाणी पातळीमध्ये वाढ होईपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा:

पावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

पुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही तर पुढे जाऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. धरणातील पाणीसाठा खालावल्याने राज्य सरकारने भातसा व अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी दिली आहे. पुढील 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा ह्या धरणांमध्ये उपलब्ध आहे. तानसामध्ये 26.64 टक्के, मध्य वैतरणा 9.52 टक्के, मोडक सागर 26.64 टक्के, भातसा 0.88 टक्के, विहार 24.66 टक्के, तुळशी 26.76 टक्के, इतका पाणीसाठा आहे.

मोनाली निचिते

Recent Posts

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

31 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago