मनपा पोटनिवडणूक : भाजपचा धुव्वा, ७ पैकी ५ जागांवर पराभव

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ६ महापालिकांच्या ७ जागांसाठी गुरुवारी मतदान झालं होतं. पोटनिवडणुकींचे निकाल आज शुक्रवार ( १० जानेवारी ) रोजी जाहीर झाले. यामध्ये ६ महापालिकेतील ७ जागांपैकी चार ५ जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव आणि लातूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर पनवेल आणि नागपूर पालिका पोटनिवडणुकीत भाजपला यश आलं.

पनवेलमध्ये भाजपचा विजय…

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला गड राखला. भाजपच्या रुचिता लोंढें पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या स्वप्नल कुरघुडेंचा पराभव केला. ३८२० मताधिक्याने रुचिता लोंढे विजयी झाल्या आहेत. रुचिता लोंढे यांना ६ हजार २३१, तर स्वप्नल कुरघुडे यांना २ हजार ३८७ मतं मिळाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा विजय…

नाशिक महापालिकेच्या प्रभाग २२ आणि २६ च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादीचे जगदीश पवार तर प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले. या निकालामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसून आलं.

नागपूर  भाजपचा विजय….

नागपूरपालिका पोट निवडणुकीत भाजपाचं कमळ फुललं आहे. भाजपाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. काँग्रेसचे पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालं. विक्रम ग्वालबंशी यांनी १३ हजार ३८६ हजार मतांनी विजय मिळवला.

मालेगावात एमआयएम- जनता दलचा विजय….

मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र १२ ड साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत जनता दल एमआयएम महाआघाडीचे मुस्तकीम डिग्नेटींनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मुस्तकीम यांना ७९९२ मते मिळाली तर काँग्रेसच्या फारूक कुरेशींना ५१० तर अपक्ष इम्रान अन्सारींना ८१५ मते मिळाली.

२०१७ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता दल शहराध्यक्ष बुलंद इकबाल हे विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं आकस्मित निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. जनता दलाचे मुस्तकीम यांच्या रूपाने आपली जागा राखण्यास यश मिळवले आहे. बुलंद इकबाल यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करून महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे विजयी झालेले मुस्तकीम डिग्नेट यांनी सांगितले.

मुंबई मानखुर्दमध्ये शिवसेनेचा विजय…

मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरेंचा विजय झाला. भाजपच्या दिनेश ( बबलू ) पांचाळ यांचा १३८५ मतांनी पराभव केला. लोकरेंनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या लोकरेंविरोधात भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि एमआयएम अशी लढत होती. मात्र, मानखुर्दमध्ये शिवसेनेने बाजी मारली. राज्यात महाविकास आघाडी असतांना सुध्दा काँग्रेसने शिवसेना विरोधात उमेदवार दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची सुरु होती.

प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे, भाजपकडून दिनेश (बबलू) पांचाळ तर काँग्रेसकडून अल्ताफ काझी रिंगणात होते. एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खानसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते.

राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

7 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

8 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago