मुंबई

OMG : मुंबईतील १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता!

टीम लय भारी

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले असून मुंबई मोठा हॉटस्पॉट बनली आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाग्रस्तांचा (Coronavirus) आकडा २१ हजारावर गेला आहे. यामुळे आधीच तणावात असताना मुंबई महापालिकेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच आता तब्बल १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) रुग्ण अचानक गायब झाले आहेत.

कोरोना व्हायरची (Coronavirus) चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचा-यांकडून ही माहिती भरताना चूक होते. अशावेळी तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत. असाच धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी याबाबत सांगितले की, मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) रुग्ण गायब झाले आहेत. त्यांनी चुकीची माहिती दिल्याने शोधणे कठीण झाले आहे. अशा लोकांना ट्रॅक करण्याचे अन्यही मार्ग आहेत. बांद्र्याच्या एका कंपनीने कर्मचा-यांची कोरोना चाचणी (COVID19 test) केली होती. मात्र, पत्ता देताना बांद्रा पूर्व असा उल्लेख केला होता. मात्र, ही कंपनी पश्चिमेची होती. अशा बेपत्ता लोकांची नावे पाठवून मुंबई महापालिकेने आधारचे डिटेल्स मागविले असल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. अधिकारी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अंधेरी पूर्वमध्ये तर २७ जण बेपत्ता झाले आहेत, असे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ यांनी सांगितले. धारावीमध्येही २९ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र, यापैकी काही जणांना शोधण्यात यश आले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

2 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

3 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

3 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

3 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

5 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

5 hours ago