मुंबई

भांडुपचा ऑक्सिजनमॅन विशाल कडणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईतील भांडुपमधील तरुण युवक विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली 2 वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहे. स्वतःचे उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे फुंकून त्यांनी कोव्हिड रूग्णांसाठी मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरचे वाटप केले आणि गेल्या 2 वर्षात त्यांनी 100 हुन अधिक कोव्हिड रुग्णांना जीवनदान दिले आहे (Bhandup Oxygenman Vishal Kadane appreciated internationally).

विशाल कडणे यांच्या निस्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली आहे. 21 जून 2021 रोजी लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र प्रदान करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे विशाल कडणे यांच्या कार्याचा सन्मान केला आहे (Vishal Kadane work has been honored by the World Book of Records).

मोदी सरकार देशाचे वैभव विकत आहे; नाना पटोलेंची मोदी सरकारवर बोचरी टीका

संजय राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार दहशत निर्माण करते

शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर असलेले विशाल कडणे हे गेले 1 वर्ष सातत्याने कोव्हिड रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कमतरता असताना त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यांच्या ह्या कार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून कौतुक केले होते.

समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करायला हवा असे विशाल कडणे यांनी सांगितले. यथाशक्ती प्रत्येकाने कोव्हिड रुग्णांची सेवा करायला हवी आणि सुरुवात स्वतः पासून करायला हवी ह्या तत्वानेच मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरची सेवा सुरु असल्याचे सांगितले.

वर्षा गायकवाडांच्या निर्णयावर अतुल भातखळकरांची घणाघात टीका

Coronavirus News Live Updates: India records 42,766 new cases; recovery rate stands at 97.20 per cent

आजपर्यंत खडतर परिस्थितीमधून मार्ग काढत असताना विशाल कडणे यांनी मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने ह्या मशीन पोहोचवल्या आहेत. ह्या सत्कार्यामध्ये विशाल यांचे सर्व कुटुंब सहभागी असून त्यांचे आई-वडील म्हणजेच जयश्री व विजय कडणे यांची प्रेरणा असल्याचे सांगितले. त्यांचे सहकारी डॉ. प्रमोद जाधव, वैभव भुर्के, गौरव पोतदार, चेतन वैद्य, पंकज चावरे आणि इतर सर्वांची मोलाची मदत होत असल्याचे विशाल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स तर्फे दखल घेऊन सन्मान झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून विशाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे (Vishal is being lauded from all walks of life).

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

12 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

13 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

15 hours ago