भारतामध्ये बनावट नोटा सरकारसाठी एक मोठं आव्हानच आहे. या समस्येपासून सुटका करण्यासाठी सरकारने सात वर्षांपुर्वी देशात नोटबंदी केली होती. तरीही बनावट नोटा बनवायच्या प्रक्रियेला आळा बसलेला नाही. बनावट नोटा बनवण्याची अशीच एक घटना मुंबई मधील मालाड पश्चिमेतील, मालवण परिसरात घडली असून भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवून विक्री करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उमेश जयकिशन कुमार (वय 32) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा फरीदाबाद , हरियाणा येथील रहिवासी आहे. सध्या तो मुंबईमध्ये कांदिवली येथील पश्चिम, जनकल्याण नगरमध्ये राहत होता.
काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी यांना मुंबईमध्ये एक व्यक्ति हा भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा रात्रपाळी कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक शेळके आणि हसन मुलाणी हे त्याच्या पोलीस पथकासह गणेश मंदिराजवळ, गेट नंबर 1 मालवणी येथे साध्या वेषात सापळा रचून आरोपीची वाट पाहता होते. रात्री 10 च्या सुमारास आरोपी उमेश कुमार हातात प्लॅास्टिकच्या काळ्या पिशवी सोबत एक लहान मुलाला घेऊन आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या त्यावेळी पोलीस पथकाने घेराव घालत त्याला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रु च्या एकूण 8 बनावट नोटा, मोबाईल फोन, भारतीय चालनातील 3000 रु अशी मालमत्ता मिळाली असून पोलिसांनी आरोपी उमेश कुमारला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुध्दा वाचा:
भाजपविरोधात विरोधकांची एकजूट; पाटण्यातील बैठकीत काय म्हणाले पवार-ठाकरे ?
शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त
पुढील तपासामध्ये आरोपी उमेश याच्या घराची झडती घेतली असता. त्याच्या राहत्या घरात लॅपटॉप, अॅपल कंपनीचा आयपॉड, 2 पेनड्राईव्ह, 4 मोबाईल,कोरे बॉन्ड पेपर रिम, मायक्रो कार्ड तसेच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये महिंद्रा एक्सयुव्हि 500 आणि एक कलर प्रिंटर मिळाला आहे, हे सर्व साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…
ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…