मुंबई

संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना इशारा, म्हणाले – ‘मै नंगा आदमी हूँ… माझ्या नादी लागू नका’

टीम लय भारी

“तुम्ही माझ्या नादी लागू नका, मै नंगा आदमी हूँ, मै शिवसैनिक हूँ बाळासाहेब ठाकरेंका…जे करायचं ते करा, मी आपल्यासारखे खूप पाहिलेत, अनेकांना उखडून टाकलंय,” अशा शब्दांत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला इशारा दिला आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावत उद्या (मंगळवारी दि. २९ डिसेंबर) चौकशीसाठी बोलावलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसेना भवनात वार्तालाप घेत ईडी आणि भाजपवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, ‘मागील दीड महिन्यांपासून ईडीने आमच्याकडून माहिती, कागदपत्रे मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीने अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले,’ असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

‘केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारं वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीनं कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणं हे लोकांनी गृहित धरलंय,’ अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

‘गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ३ नेते ईडीच्या कार्यालयात जातात. तिथून ते काही कागदपत्रं घेऊन बाहेर येतात. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि त्यांचे हस्तक मला भेटायचा प्रयत्न करत आहेत. राज्यातलं सरकार टिकू देऊ नका म्हणून माझ्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे,’ असा गंभीर आरोप राऊत यांनी वार्ताहरांना बोलताना केला.

मी त्यांचा बाप

‘राज्यातलं सरकार आम्ही पाडायचं ठरवलं आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. मला इशारे दिले जात आहेत. धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी त्यांचा बाप आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही,’ अशा इशारा त्यांनी भाजपला दिला. ‘माझ्यावर दबाव आणण्यासाठी शिवसेना आमदारांची नावांची यादी दाखवली गेली. या आमदारांना ईडी ताब्यात घेईल. त्यांचे राजीनामे घेतले जातील. सरनाईक हे याच कारवाईचं टोकन आहे, असं सांगण्यात आलं. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही,’ अशा शब्दांत राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.

अभिषेक सावंत

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago