मुंबई

शिक्षकांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा,शिक्षकांचा ताण कमी

टीम लय भारी 

मुंबई l मुंबई लोकलसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे.

दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यासाठी ५० टक्के उपस्थितीचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिण्यात आले होते.

शिक्षकांसह शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही माहिती दिली होती. अखेर आज ही मागणी मान्य करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरला पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मध्य आणि पश्चिम रेल्वेने मंजुरी दिली आहे.

याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना, कोर्टात काम करणाऱ्या वकिलांना आणि कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासीच मुभा देण्यात आली. तसंच नवरात्रात सरसकट सर्व महिलांसाठीही लोकल प्रवास सुरु करण्यात आला. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा कशी गाठायची या विवंचनेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा  निश्वास सोडला आहे.

राजीक खान

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

1 hour ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

2 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

2 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

3 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

3 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

5 hours ago