मुंबई

Shiv Sena : शिवसेना उत्तर प्रदेश पंचायत निवडणुका लढवणार; काँग्रेसकडे मागणार मदतीचा ‘हात’

टीम लय भारी

मुंबई : उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या पंचायत निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी म्हणजेच आप आणि असदुद्दीन ओवेसीं ऑल इंडिया इजलिम-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. असं असतानाच आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही (Shiv Sena) या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या महत्वपूर्ण निवडणुका म्हणून पंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या निवडणुका मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. मात्र यासाठी अनेक राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत.

शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील राज्य प्रमुख असणाऱ्या अनिल सिंह यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन पक्ष प्रभारींची नेमणूक केली जात असल्याची माहिती दिल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. सर्व जिल्ह्यांमधून प्रभारी पदासाठी अर्ज येत असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केलं. याचबरोबरच शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधीमंडळ महाराष्ट्रामध्ये येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीमध्ये राज्यामध्ये पक्षाची तयारी कशी सुरु आहे यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसंदर्भातील मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवण्याचीही तयारी सुरु करण्यात आली आहे. एक आठवडा या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिका आणि ग्रामीण भागांमध्ये शिवसेना कसं काम करते हे या पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या दौऱ्यानंतर या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पूर्वांचल आणि पश्चिम बुंदेलखंडमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर यामधूनच उमेदवार निवडण्यात येतील आणि त्यांना पक्षाकडून तिकीट दिलं जाईल. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेससोबतची चर्चा यशस्वी झाली आणि एकत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्यास पदाधिकारी तशापद्धतीने काम करतील अशी शिवसेनेची योजना आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासने

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धकाधकीची झाली आहे. त्यामुळे आजार देखील खूप कमी वयात होत आहे.…

13 mins ago

Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat…

58 mins ago

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

3 hours ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

4 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

4 hours ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

4 hours ago