मुंबई

मुंबईतील धक्कादायक घटना, पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा

टीम लय भारी

मुंबई : पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस (Police) निरीक्षकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना ही धक्कादायक घटना घडली.

वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असतानाच अचानक नायलॉनचा मांजा गळ्याजववळ आला, पण दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. वेळ न गमावता त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रीय करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले पण सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

गेल्या आठवड्यात नाशिकमध्येही एक २३ वर्षांचा तरुण मांजामुळे जखमी झाला होता. तर, नागपूर शहरातही काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षांच्या मुलाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आणि तो गंभीर जखमी झाला.

अभिषेक सावंत

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

44 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

7 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago