मुंबई

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

टीम लय भारी

मुंबई : कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा आज (दिनांक १३ जानेवारी २०२१) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. (First consignment of #CovishieldVaccine arrives in Mumbai, today (13th January 2021) morning at 5.30am.)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.

एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ व्यायाम

बदलत्या हवामानासोबत आजारही येतात. यामध्ये श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. पावसाळा संपत आला असून लवकरच थंडीचा…

4 seconds ago

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासने

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धकाधकीची झाली आहे. त्यामुळे आजार देखील खूप कमी वयात होत आहे.…

1 hour ago

Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat…

2 hours ago

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

4 hours ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

5 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

5 hours ago